मराठी बातम्या /बातम्या /Viral /मुलीच्या DNA टेस्टमुळे 27 वर्षांनंतर फुटलं महिलेचं बिंग, अन्...; हसतं-खेळतं कुटुंब उद्धवस्त

मुलीच्या DNA टेस्टमुळे 27 वर्षांनंतर फुटलं महिलेचं बिंग, अन्...; हसतं-खेळतं कुटुंब उद्धवस्त

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

एक 27 वर्षांची मुलगी एक चांगलं आयुष्य जगत होती, जोपर्यंत तिला कळालं नाही की ती ज्या व्यक्तीला तिचे वडील समजत होती ते खरं तर तिचे पिताच नव्हते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली 26 मार्च : आपलं जीवन जितकं साधं दिसतं, तितकं काहीवेळा ते सोपं नसतं. ज्या गोष्टी आपण सामान्य मानतो, त्या कधी गुंतागुंतीच्या होतात हे आपल्यालाही कळत नाही. असाच काहीसा प्रकार आनंदी आयुष्य जगणाऱ्या एका मुलीसोबत घडला. तिचं सुखी कुटुंब होतं, पण डीएनए चाचणीने सर्व काही उद्ध्वस्त केलं.

पूर्वी डीएनए टेस्ट जास्त प्रमाणत केली जात नव्हती पण आजकाल लोक अगदी सहज डीएनए टेस्ट करायला लागले आहेत. अशीच एक 27 वर्षांची मुलगी एक चांगलं आयुष्य जगत होती, जोपर्यंत तिला कळालं नाही की ती ज्या व्यक्तीला तिचे वडील समजत होती ते खरं तर तिचे पिताच नव्हते. तिच्या आईने खोटं बोलत हाच तिचा पिता असल्याचं सांगितलं होतं, परंतु बायलॉजिकली ते तिचे वडील नव्हते.

मुलीने डीएनए चाचणी केली, त्यानंतर तिला कळालं की ती ज्या व्यक्तीला 27 वर्षांपासून आपले वडील समजत होती, ते प्रत्यक्षात तिचे वडील नसून फक्त तिच्या आईचा नवरा आहे. शेवटी तिच्या आईने आपल्या मुलीसमोर सत्य स्वीकारलं की तरुणीचा जन्म तिच्या एका प्रेमप्रकरणामुळे झाला. मिररच्या रिपोर्टनुसार, मुलीने तिच्या आयुष्यातील हे विचित्र सत्य रेडिटवर सांगितलं आहे.

सध्या तिचे वडील ७० वर्षांचे आहेत आणि आईचं हे सत्य वडिलांपासून लपवायचं की त्यांना सांगायचं हे तिला समजत नाहीये. पतीला वाईट वाटेल म्हणून तिने ही गोष्ट त्याच्यापासून लपवून ठेवल्याचं आईने मुलीला सांगितलं.

मुलीला आधीच 2 बहिणी आहेत, त्या त्यांच्या वडिलांसारख्या दिसतात आणि त्यांच्या सवयी देखील वडिलांसारख्याच आहेत. या सर्वांपेक्षा वेगळी दिसणारी ती एकमेव होती. अशा स्थितीत ती बाकीच्यांपेक्षा वेगळी आहे का, अशी शंका तिच्या मनात होती. तिलाही आईच्या अफेअरची कल्पना होती, पण या अफेअरमुळेच तिचा जन्म झाला हे तिला माहीत नव्हतं. या पोस्टनंतर लोकांनी मुलीला बायलॉजिकल वडिलांना विसरून तिला सांभाळणाऱ्या वडिलांचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे

First published:
top videos

    Tags: Shocking news, Viral news