Home /News /viral /

8 वर्षांच्या शरीरात फसली 22 वर्षांची तरुणी, विचित्र आजाराचा करतेय सामना; पाहा VIDEO

8 वर्षांच्या शरीरात फसली 22 वर्षांची तरुणी, विचित्र आजाराचा करतेय सामना; पाहा VIDEO

वयापेक्षा खूप लहान आणि खूप मोठ्या दिसणाऱ्या व्यक्तींना सामाजिक आयुष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. याच समस्येचा एक महिला सध्या सामना करत आहे.

  न्यूयॉर्क, 17 डिसेंबर: 22 वर्षं वय असणारी (22 year old woman) एक तरुणी प्रत्यक्षात मात्र 7 वर्षांच्या मुलीसारखे (7 year old girl) दिसते. आपल्या वयापेक्षा (Less than age) कमी दिसणं, हे अनेकांना आवडतं. मात्र या तरुणीची परिस्थिती वेगळी आहे. एका विचित्र आजारामुळे (Strange decease) तिला या समस्येचा सामना करावा लागत आहे. आपल्या वयापेक्षा कमी किंवा जास्त दिसण्यामुळे ज्या अनेक प्रकारच्या सामाजिक समस्यांना तोंड द्यावं लागतं, त्याची कल्पना सामान्य माणसांना येऊच शकत नाही. मात्र अशा सगळ्या समस्यांवर मात करून या तरुणीनं जगण्यातला रस कायम ठेवला आहे.
  View this post on Instagram

  A post shared by TLC (@tlc)

  वयापेक्षा दिसते कमी शौना रे नावाची ही महिला तिच्या वयापेक्षा फारच लहान दिसते. प्रत्यक्षात 22 वर्षांची असूनही ती एखाद्या शाळकरी मुलीप्रमाणे दिसते. केवळ तिचा चेहराच नव्हे, तर पूर्ण शरीरच सात-आठ वर्षांच्या मुलीएवढं आहे. एका आजारामुळे तिच्या शरीरावर असा काही परिणाम झाला की त्यानंतर तिची वाढच होऊ शकली नाही. दुर्धर कॅन्सरवर केली मात शौनाच्या आयुष्यावर टीएलसीनं एक डॉक्युमेंट्री तयार केली आहे. त्यात दिलेल्या माहितीनुसार वयाच्या सहाव्या वर्षी तिला मेंदूचा कॅन्सर झाला होता. त्यावर तिने यशस्वीरित्या मातही केली. मात्र या काळात झालेल्या केमोथेरपीमुळे तिच्या पियुष ग्रंथींवर परिणाम झाला. या ग्रंथींचं काम थांबलं आणि तिची वाढ होण्याची शक्यता मालवली. व्यक्तीची शारीरिक वाढ होण्यासाठी याच ग्रंथी कारणीभूत असतात. हे वाचा- पाकिस्तानच्या या हिंदू क्रिकेटरला धर्मामुळे सहन करावा लागला होता अपमान 3 फूट 10 इंचांची उंची या महिलेची उंची 3 फूट 10 इंच इतकीच वाढली आणि त्यानंतर वाढ बंद झाली. ती 22 वर्षांची असली तरी तिला सामाजिक जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मित्रांसोबत जेव्हा ती पबमध्ये जाते, तेव्हा इतर सर्वांना प्रवेश मिळतो, मात्र तिला तिथून हाकलून दिलं जातं. जेव्हा ती ब्लाइंड डेटिंग करते, तेव्हा तिच्यासोबत अनेक तरुण गप्पा मारतात, मात्र प्रत्यक्ष भेट होते, तेव्हा ते पळून जातात, असा अनुभव तिनं शेअर केला आहे.
  Published by:desk news
  First published:

  Tags: Health, USA, Video viral, Women

  पुढील बातम्या