Home /News /viral /

एका दमात बाटलीभर व्होडका पिणं जीवावर बेतलं, भलताच स्टंट करताना तरुणाचा मृत्यू

एका दमात बाटलीभर व्होडका पिणं जीवावर बेतलं, भलताच स्टंट करताना तरुणाचा मृत्यू

मित्रांसमोर भावं खाणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. एका दमात एक बाटली व्होडका (Vodka) प्यायल्यामुळे या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

मुंबई, 31 ऑगस्ट : दारू (Alcohol) ही अशी गोष्ट आहे, की जी तुमच्या आरोग्यावर (Health) तर दुष्परिणाम करतेच, शिवाय नकळतपणे तुमचा खिसाही रिकामा करते. हे लक्षात येऊनसुद्धा अनेक जण दारू पिण्यासाठी खर्च करणं कमी करत नाहीत. काही जण अन्य व्यक्तींना दाखवण्यासाठी एका दमात दारूची संपूर्ण बाटली पिऊन रिकामी करतात. गायक हनी सिंगचं `चार बोतल व्होडका` हे गाणं गाजलं होतं; पण कोणाच्या मनात एका दिवसात व्होडकाच्या (Vodka) 4 बाटल्या पिण्याचा विचार आला असेल, तर तो लगेच मनातून काढून टाका. एक बाटली व्होडका प्यायल्याने इंग्लंडमधल्या (England) एका मुलाचा मृत्यू (Death) झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. एका आईने तिच्या मुलाबाबत घडलेली घटना नुकतीच सोशल मीडियावरून (Social Media) शेअर केली आहे. इंग्लंडमधल्या वीगन येथे मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत असलेल्या मिकी कुन्निफीचा मृत्यू एक बाटली व्होडका प्यायल्याने झाला आहे. आपल्या मित्रांवर प्रभाव टाकण्यासाठी मिकी एका दमात एक बाटली व्होडका प्यायला. त्यानंतर तो बेडवर झोपला आणि परत उठलाच नाही. त्यातच त्याचा मृत्यू झाला. यू-ट्यूबवर पाहिला होता व्हिडिओ मॅंचेस्टर इव्हिनिंग न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी मिकी आपल्या मित्रांसोबत पार्टी करत होता. मित्रांसोबत यू-ट्यूबवर (Youtube) व्हिडिओ पाहून त्याने एका दमात एक बाटली व्होडका पिण्याचा स्टंट (Stunt) केला. बाटलीभर व्होडका प्यायल्यानंतर तो बेडवर झोपला. त्याचा श्वास सुरू नसल्याचं काही वेळानंतर त्याच्या मित्रांच्या लक्षात आलं. तसंच त्याचे ओठदेखील निळे पडले होते. मिकीची ही अवस्था पाहून त्याचे मित्र घाबरले. त्यांनी तातडीनं रुग्णवाहिका बोलावली आणि मिकीला रुग्णालयात दाखल केलं. परंतु, रुग्णालयात पोहोचल्यानंतर वैद्यकीय तपासणी केली असता डॉक्टरांनी मिकीला मृत म्हणून घोषित केलं. व्होडकापुढे टॅलेंट पराभूत मिकीच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने अशा पद्धतीने व्होडका न पिण्याचं आवाहन केलं आहे. 'माझा मुलगा खूप हुशार होता. त्याला नृत्य, व्यायाम करणं आणि गिटार वाजवण्याचा छंद होता. परंतु, तो आज या जगात नाही यावर माझा विश्वास बसत नाही,' असं मिकीच्या आईनं सांगितलं. रक्तात प्रमाणापेक्षा जास्त अल्कोहोल मिसळल्याने मिकीचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं आहे. 'मित्रांसमोर भाव मारण्यासाठी एका दमात व्होडका पिणं मिकीसाठी घातक ठरलं. त्यामुळे तुम्ही अशी चूक करू नका,' असं आवाहन मिकीच्या आईने केलं आहे.
First published:

Tags: Alcohol, Health

पुढील बातम्या