मराठी बातम्या /बातम्या /Viral /स्कूटी घेऊन घराच्या गेटमध्ये शिरली अन्...; महिलेसोबत घडली भयंकर दुर्घटना, पाहा VIDEO

स्कूटी घेऊन घराच्या गेटमध्ये शिरली अन्...; महिलेसोबत घडली भयंकर दुर्घटना, पाहा VIDEO

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओच्या सुरुवातीला घराचा दरवाजा दिसतो. काही वेळात दोन महिला घराच्या गेटमध्ये स्कूटीवरून (Scooty) प्रवेश करतात आणि काही वेळात गाडीसह धाडकन कोसळतात.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओच्या सुरुवातीला घराचा दरवाजा दिसतो. काही वेळात दोन महिला घराच्या गेटमध्ये स्कूटीवरून (Scooty) प्रवेश करतात आणि काही वेळात गाडीसह धाडकन कोसळतात.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओच्या सुरुवातीला घराचा दरवाजा दिसतो. काही वेळात दोन महिला घराच्या गेटमध्ये स्कूटीवरून (Scooty) प्रवेश करतात आणि काही वेळात गाडीसह धाडकन कोसळतात.

नवी दिल्ली 03 डिसेंबर : तुम्ही सोशल मीडियावर (Social Media) सक्रीय असाल तर अनेकदा नवनवे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळत असतील. यात अनेकदा असे काही व्हिडिओ समोर येतात जे पाहूनच नेटकरी हैराण होतात तर अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात जे पाहून हसू आवरत नाही. अनेकदा समोरच्याला आपली हुशारी दाखवण्याच्या नादात आपण स्वतःसोबतच असं काहीतरी करून घेतो की लोक आपल्यावरच हसू लागतात. असाच एक व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओच्या सुरुवातीला घराचा दरवाजा दिसतो. काही वेळात दोन महिला घराच्या गेटमध्ये स्कूटीवरून (Scooty) प्रवेश करतात आणि काही वेळात गाडीसह धाडकन कोसळतात. व्हिडिओमध्ये दिसतं की एकीकडे स्कूटी पडली आणि दुसऱ्या बाजूला या दोन महिला. व्हिडिओमध्ये मजेदार बाब तेव्हा पाहायला मिळते जेव्हा एक व्यक्ती पळत येत त्यांना उठवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, या प्रयत्नात तोच पाय घसरून धाडकन खाली कोसळतो. हा व्हिडिओ अतिशय मजेशीर आहे. लोक या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट करत आहेत.

हा व्हायरल व्हिडिओ काही दिवसांपूर्वीच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ black_lover__ox नावाच्या पेजवर पाहू शकता. हा व्हिडिओ लोकांच्या इतका पसंतीस उतरत आहे की लाखो लोकांनी तो लाईक केला आहे. याशिवाय अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. अनेक सोशल मीडिया यूजर्सनी हा व्हिडिओ आपल्या अकाऊंटवरुन शेअर करत याला मजेशीर कॅप्शनही दिले आहेत.

लोकांच्या प्रतिक्रियेबद्दल बोलायचं झाल्या, एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, अशा प्रकारचा स्टंट (Bike Stunt) करण्याआधी भरपूर सराव करायला पाहिजे. तर दुसऱ्या यूजरने लिहिलं, असा भयंकर स्टंट करण्याआधी शंभर वेळा विचार करा. आणखी एकाने लिहिलं, इंश्यूरंसचे कागद ठेवले आहेत ना? याशिवायही अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या मजेशीर कमेंट केल्या आहेत.

First published:

Tags: Bike accident, Shocking accident, Shocking video viral