नवी दिल्ली, 25 जून : शॉर्ट व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म टिक टॉकवर प्रसिद्ध होण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या युक्त्यांचा वापर करतात. व्हिडीओ तयार करण्यासाठी ते धोकादायक स्टंट करीत असल्याचे दिसून आलं आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला तिच्या 2 महिन्यांच्या मुलाला व्हिडीओ तयार करण्यासाठी स्विमिंग पूलमध्ये फेकते. पाण्यात पडताच मुलाने पोहायला सुरुवात केली. हा व्हिडीओ सध्या खूप पाहिला जात आहे.
अमेरिकेच्या कोलोरॅडो स्प्रिंग्जमध्ये राहणारी क्रिस्टा मेयरने अलीकडेच तिच्या फोनमध्ये एक टिक टॉक खातं उघडलं होतं. पण तिच्या व्हिडीओंना जास्त Views मिळत नव्हते.
@mom.of.2.boyssSince tiktok wanted to remove this for violating guidelines. 😒 please do your research before reporting or removing
न्यू यॉर्क पोस्टनुसार 27 वर्षीय क्रिस्टा मेयर हिला दोन मुलं आहेत. तिने फेब्रुवारी महिन्यात टिकटॉक डाऊनलोड केला होता. मात्र गेल्या चार महिन्यात तिला जास्त Views मिळत नव्हते. टिकटॉकवर प्रसिद्ध होण्यासाठी तिने असा पर्याय निवडला. या व्हिडीओमध्ये ती स्विमिंग पुलमध्ये आपल्या मुलाल फेकत आहे. थोळ्या वेळानंतर मुल पोहोयला लागतं. मात्र मुलाला पुलात टाकल्यानंतर काही सेकंद मुल दिसतचं नाही.
क्रिस्टाने चार दिवसांपूर्वी हा व्हिडीओ शेअर केला आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की , 'ऑलिव्हर दर आठवड्याला मला आश्चर्यचकित करतो. तो केवळ दोन महिन्यांचा आहे आणि इतक्या वेगाने शिकत आहे यावर माझा विश्वास नाही. तो जणू काही एक लहान मासाच आहे.