'ही माकडं आहेत कि स्पायडर मॅन'; पाहा इमारतीवरुन खाली उतरण्यासाठीच्या धडपडीचा VIDEO

'ही माकडं आहेत कि स्पायडर मॅन'; पाहा इमारतीवरुन खाली उतरण्यासाठीच्या धडपडीचा VIDEO

एका इमारतीच्या बाहेरील बाजूच्या भिंतीवर खेळणाऱ्या आणि घसरणाऱ्या दोन माकडांचा व्हिडिओ (Monkey Viral Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 22 जून: एका इमारतीच्या बाहेरील बाजूच्या भिंतीवर खेळणाऱ्या आणि घसरणाऱ्या दोन माकडांचा व्हिडिओ (Monkey Viral Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. हर्ष गोयनका यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर (Twitter) शेअर केला होता. व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये (Caption) लिहिलं गेलं होतं, की जीवनात आपण अगदी सरळ गोष्टी पाहतो आणि याच तुमचा दिवस चांगला बनवतात.

तरुणांनी वाघाच्या गळ्यात बांधला पट्टा, शेपटी ओढली आणि..; पाहा Shocking Video

व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की दोन माकडं आपल्या पायांच्या मदतीनं भिंत पकडत इमारतीवरुन खाली उतरण्याचा प्रयत्न करत आहेत. या व्हिडिओनं नेटकऱ्यांचं भरपूर मनोरंजन केलं आहे. गोयनका यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत एक लाखाहून अधिकांनी पाहिला आहे. व्हिडिओला सहा हजाराहून अधिक लाईक आणि भरपूर रिट्विट मिळाले आहेत. दहा सेकंदाचा हा व्हिडिओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनीही आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओला त्यांनी खास कॅप्शनही दिलं आहे. यात त्यांनी म्हटलंय, की आयुष्य किती साधं आणि सोपं असतं, आपणच त्याला जास्त कठीण बनवतो.

हास्यामुळे रातोरात प्रसिद्धीझोतात आली महिला; VIDEO पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

याआधीही एका माकडाचा दिल्ली मेट्रोमधून प्रवास करतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये हे माकड मेट्रोमध्ये ऐटीत फिरताना दिसत होतं. यासोबतच ते प्रवाशांसोबत त्यांच्या शेजारी सीटवर जाऊन बसल्याचंही यात दिसत होतं. माकडाचा हा व्हिडिओ शनिवारी ट्विटरवर शेअर केला गेला होता. माकडाला मेट्रोमध्ये राहून आसपासचे प्रवाशीही आश्चर्यचकीत होतात. मेट्रोनं प्रवास करणाऱ्याच एका व्यक्तीनं आपल्या मोबाईलमध्ये शूट केलेला हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Published by: Kiran Pharate
First published: June 22, 2021, 1:00 PM IST

ताज्या बातम्या