Home /News /viral /

भररस्त्यात तरुणांची तुफान हाणामारी; VIDEO चा शेवट पाहून चक्रावून जाल

भररस्त्यात तरुणांची तुफान हाणामारी; VIDEO चा शेवट पाहून चक्रावून जाल

या व्हिडिओमध्ये दोन तरुण रस्त्यावरच हाणामारी करताना दिसतात, मात्र व्हिडिओच्या शेवटी असं काही घडतं, ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल.

    नवी दिल्ली 29 मे : सोशल मीडिया अनेक नवनवे व्हिडिओ व्हायरल होत राहतात. इथे तुम्हाला अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे हैराण करतात, हसवतात, रडवतात आणि कधी कधी तुम्हाला हे व्हिडिओ पाहून संतापही येतो. मात्र सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही बुचकळ्यात पडाल. कारण या व्हिडिओमध्ये दोन तरुण रस्त्यावरच हाणामारी करताना दिसतात, मात्र व्हिडिओच्या शेवटी असं काही घडतं, ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. अलीकडेच @TansuYegen नावाच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे जो खूप व्हायरल होत आहे (Funny road fighting video) . काहीही! 2 तरुणींचा कॅमेऱ्यासमोर रंगला भलताच खेळ; VIDEO पाहून हैराण व्हाल व्हिडिओमध्ये दोन तरुण रस्त्यावरच हाणामारी करताना दिसत आहेत. मात्र मोठी गोष्ट म्हणजे या भांडणाचा शेवट काही औरच होतो. तुम्ही अनेकदा लोक रस्त्यावर हाणामारी करताना पाहिलं असेल. मात्र, सध्या व्हायरल होणारा हा व्हिडिओ अगदी वेगळा आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दुसऱ्याला रस्त्यावर पाडून मारहाण करताना दिसत आहे. हा व्यक्ती अगदी रागात खालच्या व्यक्तीला मारत आहे. मात्र दुसरा व्यक्ती हुशारीने आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि अखेर त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करत उभा राहतो. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की निळ्या रंगाच्या टी-शर्टमधील व्यक्ती काळ्या रंगाच्या टी-शर्टमधील व्यक्तीला आधी खाली पाडून मारतो आणि नंतर गाडीकडे त्याला खेचत नेतो आणि त्याचा गळाही दाबू लागतो. आता तुम्हाला वाटेल की भांडण खूप तीव्र वळण घेत आहे, परंतु जेव्हा काळ्या टी-शर्टमधील व्यक्तीचा चष्मा खाली पडतो तेव्हा तो उचल्यासाठी खाली वाकतो आणि त्यांची भांडणं तिथेच संपल्याचं पाहायला मिळतं. यानंतर जे घडतं ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या हाणामारीनंतर दोघंही हस्तांदोलन करतात आणि तिथून निघून जातात. VIDEO: मनाविरुद्ध लग्न लावल्याचा राग? नवरीने नवरदेवासोबत स्टेजवरच केलं असं काही की सगळेच शॉक हा व्हिडिओ 60 लाखहून अधिकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका व्यक्तीने या दोघांचंही कौतुक करत म्हटलं की भांडण होणं अगदी सामान्य बाब आहे, मात्र भांडणानंतरही एकमेकांच्याप्रती सहानुभूती दाखवणं, ही मोठी गोष्ट आहे. दुसऱ्या एकाने लिहिलं की हॅपी एंडिंग झाली. इतरही अनेकांनी ही अतिशय प्रेमळ हाणामारी असल्याचं म्हटलं आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Shocking video viral, Video Viral On Social Media

    पुढील बातम्या