मुंबई, 23 नोव्हेंबर : पुरुष घराबाहेर कितीही मोठा बॉस असला तरी घरात बायकोच (Husband and wife) बॉस असते. पत्नीसमोर पतीचं काहीच चालत नाही. ही व्यथा फक्त माणसांचीच नाही तर प्राण्यांचीही (Animal video). अगदी जंगलाचा राजा म्हणून मिरवणारा सिंहही (Lion video) सिंहिणीसमोर फेल आहे. सिंहिणीने सिंहाची भयंकर अवस्था केली आहे (Female lion attacked on male lion). हा व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल (Viral video) होतो आहे (Lionesses Attacking Lion).
दोन सिंहिणीने एका सिंहाला घेरलं आणि त्याची अक्षरशः वाट लावली आहे. सिंहिणींनी त्याला दोन्ही बाजूंनी पकडून धरलं आणि त्याच्यावर हल्लाच केला. सिंहिणींचं रूप पाहून सिंहही घाबरला. त्या दोघींपासून दूर पळू लागला. त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागला. एरवी रूबाबदारपणे मिरवणारा आणि इतर सर्व प्राण्यांना घाबरणारा त्यांची शिकार करणारा सिंहाची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. इतका हतबल आणि घाबरलेला सिंह कदाचित कुणीच पाहिला नसेल.
View this post on Instagram
wild_animal_shorts_ या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. याआधीसुद्धा अशाच एका सिंहाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्याला एक-दोन नव्हे तर सहा सिहिंणीनी घेरलं होतं. सिंहिणी सिंहाची शिकार करताना दिसत आहेत. सिंह आपला जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने ओरडतो आहे. पण सिंहिणी काही त्याला सोडत नाही
हे वाचा - बिबट्याचं कधीच पाहिलं नसेल असं रूप; VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येतील अश्रू
सिंह जमिनीवर पडला होता. एका सिंहिणीने त्याचा पाय पकडला, एकिने तोंड पकडलं तर एक त्याच्या पाठीजवळ होती, जी त्याच्या शरीरावरील केस काढत होती. इतर दोन-तीन सिंहिणी सिंहाच्या शेजारीच बसलेल्या दिसतात. त्या मधून मधून सिंहावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी सिंह त्यांना आपल्या हाताने मारून प्रतिकार करण्याचा दूर लोटण्याचा प्रयत्न केला.
हे वाचा - आलं अंगावर घेतलं शिंगावर! सिंहाला रेड्याने हवेत गरागरा फिरवलं; खतरनाक VIDEO
तो या सिंहिणींच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होता. पण सिंहिणीने त्याला असं पकडून ठेवलं होतं की त्याची सुटका होणं अशक्यच होतं. त्याने थोडी जरी धडपड केली तरी त्या त्याच्यावरील आपली पकड अधिक मजबूत करत होत्या. ज्यामुळे होणाऱ्या वेदनेने तो ओरडतही होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral videos, Wild animal