Home /News /viral /

OMG! आईच्या पोटातून बाहेर आलं असं बाळ; डिलीव्हरी करणारे डॉक्टरही हादरले

OMG! आईच्या पोटातून बाहेर आलं असं बाळ; डिलीव्हरी करणारे डॉक्टरही हादरले

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

बाळ पूर्णपणे निरोगी, ठणठणीत होतं पण तरी ते इतर बाळापेक्षा खूप वेगळं होतं.

    लंडन, 05 जुलै : 9 महिने बाळाला पोटात ठेवल्यानंतर त्याची आई आणि त्याचे वडील त्याची या जगात येण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. बाळ कसं असेल हे पाहण्याची उत्सुकता त्यांना असते. डॉक्टरांनाही बाळ ठिक असेल की नाही याची चिंता असते. सध्या यूकेतील असंच एक बाळ चर्चेत आलं आहे. जे पूर्णपणे निरोगी आहे. तरी त्याला पाहून त्याच्या पालकांसह डॉक्टरही हादरले आहेत  (Amazing Baby Born). बकिंघमशायरच्या चेडिंगटनमध्ये राहणारी 27 वर्षांची एमी स्मितची (Amy Smit)  सिझरियन डिलीव्हरी झाली. पण तिने अशा बाळाला जन्म दिला जो निरोगी, स्वस्थ तर होता पण इतर बाळांपेक्षा वेगळा होता. त्याच्या वेगळेपणाचं कारण म्हणजे त्याचं वजन आणि उंची (Tall and weighted baby). आपलं बाळ जास्त स्वस्थ आणि लांब आहे, याची कल्पना तिला स्कॅन्समुळे आली होती. त्यामुळे तिने आणि त्याच्या पार्टनरने सिझेरियन डिलीव्हरी करण्याचा निर्णय घेतला. 25 मार्चला ऑपरेशन करून हे बाळ या जगात आलं. हे वाचा - Shocking! बहीण-भावाने एकमेकांशी केलं लग्न; जन्माला आलं विचित्र मूल, काही तासांतच मृत्यू सामान्यपणे बाळाचं वजन जन्मावेळी 3.5 ते 4 किलो असतं. पण एमीच्या बाळाचं वजन गर्भातच 5 किलोपेक्षा जास्त झालं होतं. त्याची उंचीही जन्मावेळी 2 फूट होती.  डेली स्टारच्या रिपोर्टनुसार एमी आणि तिच्या पार्टनरची उंची जवळपास 6 फूट आहे. त्यामुळे बाळ लांब असण्यात काही आश्चर्य नव्हतं. पण ते 2 फूट लांब असेल याची कुणालाच कल्पना नव्हती.  त्याला गर्भातून बाहेर काढण्यासाठी दोन लोक लागले. तेव्हा कुठे त्याला खेचता आलं. जन्मानंतर ज्या स्केलवर त्याचं वजन आणि उंची मोजण्यात आली, तेसुद्धा त्याच्यासाठी लहान पडलं. सामान्यपणे पालक आपल्या मुलाच्या जन्माआधी त्याच्यासाठी कपडे खरेदी करतात. एमीने आपल्या बाळाला 3 महिन्याच्या मुलाचा कपडे घातले तर तेसुद्धा त्याला फिट होत नव्हते. शेवटी त्याला 6-9 महिन्याच्या मुलांचे कपडे घालण्यात आले. हे वाचा - बापरे! शेकडो फूट उंचावर चिमुकलीचा Dangerous Stunt; काळजाचा ठोका चुकवणारा Video एमीने बाळाचं नाव जॅग्रीस ठेवलं आहे. त्याचं शरीर पाहता त्याच्या वडिलांनी त्याला आता रग्बी प्लेअर बनवण्याचं ठरवलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Lifestyle, Small baby, Viral

    पुढील बातम्या