• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; अन्नासाठी 2 कुत्रे आपसात भिडले, तिसऱ्याने हळूच येत मारला ताव, VIDEO

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; अन्नासाठी 2 कुत्रे आपसात भिडले, तिसऱ्याने हळूच येत मारला ताव, VIDEO

खाण्यासाठी 2 कुत्र्यांमध्ये भयंकर भांडण सुरू होतं. इतक्यात एक तिसरा कुत्रा तिथे येतो आणि त्यांच्या भांडणाचा फायदा घेत या अन्नावर ताव मारतो.

 • Share this:
  नवी दिल्ली 20 नोव्हेंबर : कुत्र्यांची (Dog) गणना जगातील सर्वाज समजदार प्राण्यांमध्ये होते. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे ते माणसांची भाषा आणि हावभाव खूप चांगल्या पद्धतीनं ओळखतात. आपण आनंदी असो किंवा दुःखी, तर ते आपली भावना समजून घेतात. इतकंच नाही तर आपले इशारेही त्यांना कळतात. सध्या अशाच एका हुशार कुत्र्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलात व्हायरल (Viral Video of Dog) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही दोन मांजरी आणि एका माकडाची गोष्ट आठवेल. व्हिडिओमध्ये दिसतं की कुत्रा आपल्या ताटातील पदार्थ खात असतो. मात्र इतक्यात दुसरा कुत्रा तिथे येतो आणि त्याच्यासोबत भिडतो. खाण्यासाठी दोघांमध्ये भयंकर लढाई सुरू होते. इतक्यात एक तिसरा कुत्रा तिथे येतो आणि त्यांच्या भांडणाचा फायदा घेत या अन्नावर ताव मारतो. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही कुत्र्याच्या हुशारीचं कौतुक कराल. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक कुत्रा आपल्या कटोरीमधील अन्न खाताना दिसतो. अचानक तिथे दुसरा एक कुत्रा येतो आणि त्या अन्नासाठी समोरच्या कुत्र्यासोबत भिडतो. ही भांडणं पाहून एक तिसरा कुत्राही तिथे येतो आणि दोघांची भांडणं सुरू असताना तो या अन्नावर ताव मारतो. मात्र नंतर दोन्ही कुत्रे त्याच्यावर हल्ला करतात पण तोपर्यंत त्यानं ताटातील अन्न संपवलेलं असतं. हा मजेशीर व्हिडिओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओसोबतच त्यांनी कॅप्शन देत लिहिलं, की शब्दांची गरज नाही. बातमी देईपर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून शेकडो जणांनी लाईकही केला आहे. एका यूजरनं यावर कमेंट करत लिहिलं, या व्हिडिओनं खूप मोठा धडा शिकवला. दुसऱ्या यूजरनं लिहिलं की हा व्हिडिओ पाहून मला माकड आणि मांजराची गोष्ट आठवली. इतरही अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: