मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बहुमजली इमारतीला लागली आग; बचावासाठी 2 तरुणांनी जे केलं ते पाहून येईल अंगावर काटा, Shocking Video

बहुमजली इमारतीला लागली आग; बचावासाठी 2 तरुणांनी जे केलं ते पाहून येईल अंगावर काटा, Shocking Video

Fire Video: इमारतीला आग लागताच पाचव्या मजल्यावरील दोन युवक आत अडकले. यानंतर हे युवक खिडकीला लटकून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतं

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 19 डिसेंबर : सोशल मीडियावर सध्या एक थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Fire) होत आहे. यात दिसतं की एका बहुमजली इमारतीला आग लागताच काही युवकांनी आपला जीव वाचवण्यासाठी असं काही केलं, जे पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. जेव्हा एखाद्या इमारतीमध्ये आग लागते (Fire Breaks out in Building) तेव्हा वरच्या मजल्यावर असलेल्या लोकांना आपला जीव वाचवणं अतिशय कठीण होऊन जातं. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आग लागल्याचं पाहायला मिळतं.

VIDEO - एक पाय गमावला पण खचला नाही! दिव्यांगाने वाऱ्याच्या वेगाने पळवली सायकल

इमारतीला आग लागताच पाचव्या मजल्यावरील दोन युवक आत अडकले. यानंतर हे युवक खिडकीला लटकून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतं. ही घटना न्यूयॉर्कच्या मॅनहट्टन येथील आहे. मॅनहट्टनच्या ईस्ट व्हिलेजमध्ये एका बहुमजली इमारतीला आग लागली होती. या आगीत दोन युवक आपल्या घरातच अडकले होते. यानंतर त्यांना बाहेर येण्यासाठी कोणताही रस्ता सापडत नव्हता. यामुळे या तरुणांनी आपला जीव वाचवण्यासाठी खिडकीचा सहारा घेतला.

दोघंही सर्वात आधी खिडकीला लटकल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं. बराच वेळ ते खिडकीतच लटकून राहतात. यानंतर यातील एकाला खिडकीच्या शेजारीच एक पाईप दिसला. यानंतर दोघेही पाईपाच्या सहाय्याने खाली उतरले आणि त्यांनी आपला जीव वाचवला. मिळालेल्या माहितीनुसार, जॅकब रीस हाउसमध्ये 118 एवेन्यू डीमध्ये इलेक्ट्रीक बाईकच्या बॅटरीने पेट घेतला. यानंतर ही आग पाचव्या मजल्यापर्यंत पोहोचली. या घटनेत एका युवकाचा जीवही गेला.

लायसन्स मागितले म्हणून कारचालकाने वाहतूक पोलिसाला नेले 1 किमी फरफटत,VIDEO

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी या युवकांच्या हिमतीचं कौतुक केलं आहे. नेटकरी म्हणाले की या युवकांनी अतिशय कठीण परिस्थितीत आपला जीव वाचवला. हा व्हिडिओ आतापर्यंत अडीच लाखहून अधिकांनी पाहिला आहे.

First published:

Tags: Fire, Video Viral On Social Media