मराठी बातम्या /बातम्या /Viral /अजब! नवजात बाळाच्या पोटात जुळे भ्रूण; डॉक्टरांनी केला धक्कादायक खुलासा

अजब! नवजात बाळाच्या पोटात जुळे भ्रूण; डॉक्टरांनी केला धक्कादायक खुलासा

नवजात मुलीचा जन्म याच महिन्यात झाला होता. डॉक्टरांच्या असं लक्षात आलं, की या बाळाचं पोट इतर बाळांच्या तुलनेत मोठं आहे.

नवजात मुलीचा जन्म याच महिन्यात झाला होता. डॉक्टरांच्या असं लक्षात आलं, की या बाळाचं पोट इतर बाळांच्या तुलनेत मोठं आहे.

नवजात मुलीचा जन्म याच महिन्यात झाला होता. डॉक्टरांच्या असं लक्षात आलं, की या बाळाचं पोट इतर बाळांच्या तुलनेत मोठं आहे.

नवी दिल्ली 30 जुलै : नुकतीच एक अजब घटना समोर आली आहे. या घटनेत एका नवजात मुलगी गरोदर (Infant Pregnant) असल्याचं समोर आलं आहे. अनेकांनी हा एक चमत्कार असल्याचं म्हटलं, तर अनेकांनी ही एक दुर्मिळ घटना (Abnormal Incident) असल्याचं म्हटलं आहे. तज्ज्ञांचं असं मत आहे, की पाच लाख बाळांमधील एखाद्याच बाळासोबत असं काही होतं. ही घटना इस्त्राइलच्या (Israel) अशदोद येथे घडली आहे.

द सनमध्ये आलेल्या वृत्तानुसार, नवजात मुलीचा जन्म याच महिन्यात इस्त्राइलच्या अशदोदमधील अस्सुता मेडिकल सेंटरमध्ये झाला होता. डॉक्टरांच्या असं लक्षात आलं, की या बाळाचं पोट इतर बाळांच्या तुलनेत मोठं आहे. यानंतर या बाळाचं अल्ट्रासाउंड आणि एक्स-रे काढण्यात आला. यातून असं समोर आलं, की बाळाच्या पोटात एक भ्रूण विकसित होत आहे. हे भ्रूण मुलीच्या पोटात मागील दहा आठवड्यांपासून विकसित होत होतं. दहा आठवड्यांमध्ये बाळाच्या पोटातील भ्रूणाचा मेंदू, हाथ, हृदय आणि पायही विकसित झाले होते.

लग्नानंतर पहिल्याच रात्री फरार झाली पत्नी; विवाहाची अजब कहाणी ऐकून पोलिसही हैराण

Neonatology चे संचालक उमर ग्लोबस म्हणाले, की गर्भ अद्याप पूर्ण विकसित झालेला नाही. बाळाच्या पोटात एक भ्रूण आढळल्यानं आम्ही सर्वच हैराण झालो आहोत. एक्सपर्ट्सच्या टीमनं ऑपरेशन करून नवजात बाळाच्या पोटातून हे भ्रूण काढलं. सध्या या मुलीची प्रकृती स्थिर आहे. ऑपरेशच्या दरम्यान डॉक्टरांना आढळलं की या नवजात मुलीच्या पोटात एक नाही तर दोन भ्रूण आहेत.

'सल्लू' गावाबद्दल ऐकलंय का? अविवाहित युवकांची लागलीये रांग, मुली का देतायेत नकार

डॉक्टरांना अशी शंका आहे, की मुलीच्या पोटात आणखी एक भ्रूण असू शकतं. डॉक्टर वारंवार या बाळाचं चेकअप करत आहेत. डॉक्टरांनी सांगितलं की इस्त्राइलमध्ये याआधीही नवजात बाळाच्या पोटामध्ये भ्रूण आढळून आल्याच्या 7 घटना समोर आल्या आहेत. यातील एक मुलगी आता पंधरा वर्षाची झाली असून ती पूर्णपणे फीट आहे.

First published:
top videos

    Tags: Small baby, Viral news