Fact Check : 1 सप्टेंबरपासून देशभरात वीजबिल माफ होणार?

Fact Check : 1 सप्टेंबरपासून देशभरात वीजबिल माफ होणार?

1 सप्टेंबरपासून वीजबिल माफ होणार असल्याचा दावा खरा आणि की खोटा जाणून घ्या.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट: 1 सप्टेंबरपासून वीजबिल माफ होणार असे अनेक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये असे सांगितले जात आहे की सरकार वीज बिल माफी योजना 2020 आणत आहे.

या अंतर्गत सप्टेंबरपासून प्रत्येकाचे वीज बिल माफ केले जाईल असं ह्या व्हिडीओमध्ये सांगितलं जात आहे. याबाबत पीआयबीने हा दावा खोटा असल्याचे तपासले आहे. पीआयबीच्या फॅक्ट चेकमध्ये सरकारने अशी कोणतीही योजना जाहीर केलेली नाही असं सांगण्यात आलं आहे. वीज बिलाची बातमी खोटी आहे. अशी कोणतीही योजना आणणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. अशा खोट्या बातम्यांपासून सावध राहण्याचा इशारा PIB ने दिला आहे.

हे वाचा-गवत खाता खाता गाढवाच्या तोंडात आला साप; काय झालं मग VIDEO पाहा

पीआयबीच्या फॅक्ट चेकमध्ये ही वृत्त खोट असल्याचं सांगितलं जात आहे. सरकारनं अशी कोणतीही योजना आणली नाही अथवा आणणार नाही. या व्हिडीओमधून कोणाकोणाचं वीज बिल माफ होणार अशीही माहिती देण्यात आली आहे.

अशी कोणतीही योजना सरकारनं आणली नाही. त्यामुळे अशा बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पीआयबीनं केलं आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 28, 2020, 2:35 PM IST
Tags:

ताज्या बातम्या