• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • 61 वर्षाच्या बॉयफ्रेंडला घरी घेऊन गेली 19 वर्षीय तरुणी; रागात कुटुंबीयांनी उचललं मोठं पाऊल

61 वर्षाच्या बॉयफ्रेंडला घरी घेऊन गेली 19 वर्षीय तरुणी; रागात कुटुंबीयांनी उचललं मोठं पाऊल

19 वर्षीय युवतीनं आपल्या 61 वर्षाच्या प्रियकरासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. या व्यक्तीला आधीपासूनच दोन मुलं आहे आणि तरुणीला याबाबत माहितीही होती.

 • Share this:
  नवी दिल्ली 19 सप्टेंबर : अमेरिकेतील एका 19 वर्षीय मुलीनं 61 वर्षाच्या वृद्धासोबत लग्न (Marriage) केल्यानंतर खुलासा केला की आधी तिच्या कुटुंबीयांनी या नात्याला विरोध केला होता. युवतीनं सांगितलं, की जेव्ही ती पहिल्यांदाच प्रियकराला (Boyfriend) आपल्या कुटुंबीयांना भेटवण्यासाठी घरी गेली तेव्हा कुटुंबीयांनी थेट पोलिसांनाच (Police) बोलावलं. 19 वर्षीय युवतीनं आपल्या 61 वर्षाच्या प्रियकरासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. या व्यक्तीला आधीपासूनच दोन मुलं आहे आणि तरुणीला याबाबत माहितीही होती. जगात केवळ दोनच ठिकाणी फुलतं हे दुर्मिळ फूल; किंमत ऐकून व्हाल थक्क, रंजक आहे कथा तरुणीनं सांगितलं, की तिच्या आई-वडिलांनी पहिल्यांदा पोलिसांना बोलावलं होतं, मात्र आता हे नातं जुळल्यानंतर कुटुंबीयांनीही त्यांचं स्वागत केलं. वयात 42 वर्षाचं अंतर असूनही हे जोडपं एकमेकांवर जीवापड प्रेम करतं. हा व्यक्ती एक अनुभवी सैन्य पोलीस आहे. स्माईल मूनवर ऑनलाईन चॅट (Online Chat) केल्यानंतर काही महिन्यांतच हे दोघं एकमेकांना भेटले. ऑड्रेनं सांगितलं, की त्याला पाहून मी उत्सुकही होते आणि घाबरलेही होते. युवतीनं सांगितलं, की पहिल्या भेटीतच केविननं पुढाकार घेतला आणि आपला हात माझ्या चेहऱ्याजवळ आणला. ही आमची पहिलीच समोरासमोर झालेली भेट होती. आम्हाला या पहिल्याच नजरेत एकमेकांवर प्रेम झालं होतं. विद्यार्थीनीचे केस कापणं शिक्षिकेला पडलं महागात; पालकांनी मागितली 7 कोटी भरपाई ऑड्रेनं म्हटलं, की आम्ही सुरुवातीला सैन्याबाबतच बातचीत केली. नंतर त्यानं मला माझ्याबद्दल काही प्रश्न विचारले आणि आम्ही एकमेकांसोबत बरंच काही शेअर केलं. आम्ही बऱ्याच गोष्टींवर बातचीत केली. युवतीनं म्हटलं, की मला केविन खूप आवडायचे. अजूनही आमचं एकमेकांप्रती असलेलं प्रेम वाढतंच आहे. हेच आमच्या नात्याला अधिक खास बनवतं. ऑड्रेला भेटण्याआधी केविनच्या लग्नाला 19 वर्ष झालेले होते आणि त्यांना 16 तसंच 23 वर्षाची दोन मुलंही आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: