मराठी बातम्या /बातम्या /Viral /

19 वर्षांची वधू आणि 70 वर्षांच्या नवरदेव, अजब लग्नाची गजब गोष्ट, नेमकं असं का झालं?

19 वर्षांची वधू आणि 70 वर्षांच्या नवरदेव, अजब लग्नाची गजब गोष्ट, नेमकं असं का झालं?


एका तरुणीने वृद्ध पुरुषासोबत विवाह केला आहे. त्यामुळे आजोबा-नाती सारखं दिसणारं हे जोडपं सध्या जोरदार चर्चेत आहे.

एका तरुणीने वृद्ध पुरुषासोबत विवाह केला आहे. त्यामुळे आजोबा-नाती सारखं दिसणारं हे जोडपं सध्या जोरदार चर्चेत आहे.

एका तरुणीने वृद्ध पुरुषासोबत विवाह केला आहे. त्यामुळे आजोबा-नाती सारखं दिसणारं हे जोडपं सध्या जोरदार चर्चेत आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर : असं म्हणतात की जो प्रेमात पडतो त्यालाच त्याची उत्कटता समजते. प्रेम आंधळं असतं, अशी एक म्हण देखील प्रसिद्ध आहे. पाकिस्तानातील एका जोडप्याने ही म्हण खरी करून दाखवली आहे. या जोडप्याची प्रेमकहाणी सध्या खूप चर्चेत आहे. आपल्यापेक्षा 51 वर्षांनी मोठ्या व्यक्तीशी कोणी लग्न कसं करू शकतं का?, असा प्रश्न सध्या लोकांना बुचकळ्यात टाकत आहे. एका पाकिस्तानी युट्यूबरने ही अनोखी कहाणी जगासमोर आणली आहे.

एका तरुणीने वृद्ध पुरुषासोबत विवाह केला आहे. त्यामुळे आजोबा-नाती सारखं दिसणारं हे जोडपं सध्या जोरदार चर्चेत आहे. आम्ही पूर्ण विचार करून लग्नाचा निर्णय घेतला असल्याचं या जोडप्यानं स्पष्ट केलं आहे. लग्नाला कायद्याने परवानगी दिल्याने ज्येष्ठ किंवा तरुण हा प्रश्नच राहत नाही, असं या 70 वर्षाच्या पतीचं म्हणणं आहे.

(लग्नात नवरा-नवरीकडून अशा कॉन्ट्रॅक्टवर साईन, आता प्रत्येक महिन्याला मिळणार फ्री पिझ्झा)

लग्नासाठी वर आणि वधूमध्ये पाच ते सहा वर्षाचं अंतर योग्य मानलं जातं. परंतु, हेच अंतर जर 51 वर्षांचं असेल तर तुम्ही अशा लग्नाला काय म्हणाल? सध्या पाकिस्तान आजोबा आणि नातीसारखं दिसणारी पती-पत्नीची जोडी जोरदार चर्चेत आहे. या जोडप्याची मुलाखत पाकिस्तानातील एका युट्यूब चॅनेलवर व्हायरल झाली आहे.

आदर आणि प्रतिष्ठेसाठी 'प्रेम'

पाकिस्तानी युट्यूबर सैय्यद बासित अलीने ही प्रेमकहाणी जगासमोर आणली आहे. 19 वर्षांची शुमायला आणि 70 वर्षांच्या लियाकत अलींची ही प्रेमकहाणी आहे. लाहोरमध्ये मॉर्निंग वॉकदरम्यान या दोघांची ओळख झाली. 'प्रेम वय पाहत नाही, ते नकळत होऊन जातं. पहिल्यांदा माझ्या कुटुंबीयांचा या नात्याला विरोध केला, पण नंतर त्यांनी हे नातं मान्य केलं. लग्नात कोणत्याही गोष्टीपेक्षा आदर आणि प्रतिष्ठा महत्त्वाची असते. अशा परिस्थितीत, वाईट नात्यापेक्षा योग्य व्यक्तीशी लग्न करणं केव्हाही चांगलं,' असं शुमायलानं सांगितलं.

(लिंगबदल केल्यानंतर झाला पश्चात्ताप; महिला झालेल्या तरुणाला पुन्हा बनायचंय पुरुष)

पत्नीच्या स्वयंपाकावर भाळला पती

'माझं वय जरी 70 वर्षं असलं तरी मी मनानं तरुण आहे. मला माझ्या पत्नीनं केलेलं जेवण इतकं आवडतं की मी रेस्टॉरंटमध्ये खाणं बंद केलं आहे,' असं लियाकत अली सांगतात. दुसरीकडे दोघांच्या वयातील 51 वर्षांच्या अंतराबाबत लियाकत म्हणाले की, 'कायद्याने एखाद्याला लग्न करण्याची मुभा दिली असेल, तर ज्येष्ठ किंवा तरुण असण्याचा प्रश्नच येत नाही.' या पूर्वी सय्यद बासित यांनी पाकिस्तानमधील वयामध्ये जास्त फरक असलेल्या जोडप्यांच्या लग्नाच्या कथा जगासमोर मांडल्या आहेत.

First published:

Tags: Love story, Marriage, Pakistan