Home /News /viral /

अरेरे! आधी 25 कोटींची गाडी ठोकली, मग बनवला VIDEO; बाबांना दाखवला आणि...

अरेरे! आधी 25 कोटींची गाडी ठोकली, मग बनवला VIDEO; बाबांना दाखवला आणि...

हा VIRAL VIDEO पाहून...तुम्हीही म्हणाल एवढी रिस्क? असं कोण करतं भावा?

    वॉशिंग्टन, 20 नोव्हेंबर : यूट्युबवर व्हिडीओ तयार करण्यासाठी कोणत्याही थराला जातात. काही जण जीवाशी खेळ करतात, तर काही जण आपलाच जीव धोक्यात घालतात. असंच काहीसं 17 वर्षीय युट्युबरसोबत घडलं. या युट्युबरनं चक्क आपल्या वडिलांची गाडी ठोकली. ती सुद्धा 25 कोटींची. हे वाचून काहींना भीती वाटली असेल. 17 वर्षीय युट्युबर गेज गिलियननं आपल्या वडिलांची 25 कोटींची ड्रीम कार ठोकली. अमेरिकेच्या टेक्सासमध्ये पगानी हूयरा रोडस्टर नावाच्या कारचा अपघात झाला. या गाडीची अवस्था पाहून गेज गिलियनचा जीव कसा वाचला हे सर्वांनाच आश्चर्य वाटले. मात्र त्यानंतर वडिलांची गाडी ठोकली म्हणून त्याला भीती वाटली. वाचा-आई-वडिलांची आयुष्यभराची कमाई घेऊन पळाली लेक, 1.25 कोटी रुपयांची चोरी केली पण... वाचा-...आणि ती वाचली! 50 फूट खोल विहिरीत पडली हत्तीण, रेस्क्यू ऑपरेशनचा LIVE VIDEO जेव्हा हा अपघात झाला तेव्हा त्याचा मित्र जॅक वॉकर कारमध्ये उपस्थित होता. सुरुवातीच्या चौकशीत असे दिसून आले की, गेज गाडी वेगानं चालवत होता, त्यानंतर गाडी झाडाला ध़डकली. हा अपघात झाल्यानंतर गेजनं एक व्हिडीओ तयार केलाय. यात गेजनं, "मला आयुष्यात दुसरी संधी दिली याबद्दल देवाचे आभार. या अपघातात आमच्या दोघांनाही गंभीर दुखापत होऊ शकली असती. मात्र तसे काही घडले नाही. आम्ही भाग्यवान आहोत". वाचा-BMW कारमधून तरुणांची गुंडगिरी, भरचौकात दाम्पत्यावर चालवली गोळी, पाहा LIVE VIDEO मिळालेल्या माहितीनुसार, गेजच्या वडिलांनी जूनमध्येच ही इटालियन सुपर कार खरेदी केली होती. गॅगेचे वडील टिम गिलियन यांना कारची फार आवड आहे. पगानी हुआयरा रोडस्टर कारशिवाय रोल्स रॉयस डॉन, फेरारी, लॅम्बोर्गिनी आणि मॅकलारेन सेन्ना यासारख्या गाड्याही त्यांच्याकडे आहेत. टिमने अलीकडेच एक मेगा याट खरेदी केली आहे, ज्याची किंमत 20 मिलियन डॉलर्स आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Video viral

    पुढील बातम्या