मराठी बातम्या /बातम्या /Viral /OMG! 14 पायांचं झुरळ; इतकं मोठं झुरळ कधी पाहिलंत का?

OMG! 14 पायांचं झुरळ; इतकं मोठं झुरळ कधी पाहिलंत का?

हे दुर्मिळ असं झुरळ (cockroach) दुसऱ्यांदा सापडलं आहे.

हे दुर्मिळ असं झुरळ (cockroach) दुसऱ्यांदा सापडलं आहे.

हे दुर्मिळ असं झुरळ (cockroach) दुसऱ्यांदा सापडलं आहे.

मुंबई, 21 जुलै : आतापर्यंत तुम्ही जमिनीवर चालणारं झुरळ (cockroach) पाहिलं आहे. मात्र इतकं मोठं झुरळ कधी पाहिलंत का? हा फोटो पाहूनच इतकं मोठं झुरळ असू शकतो यावर विश्वासच बसणार नाही. मात्र इतक्या आकाराचं झुरळ प्रत्यक्षात सापडलं आहे. तेदेखील हिंदी महासागरात. हे समुद्रात राहणारं दुर्मिळ असं झुरळ आहे.

समुद्रात सापडणाऱ्या या झुरळाला जायंट सी कॉक्रोच किंवा डीप सी कॉक्रोज म्हटलं जातं. बॅथीनोमस रकसासा (Bathynomus raksasa) हे त्याचं वैज्ञानिक नाव आहे.  हा समुद्रातील आइसोपॉडच्या प्रजातीतील क्रस्टेशियन जीव आहे. याला सामान्य झुरळाप्रमाणे सहा नव्हे तर तब्बल 14 पाय असतात. यांचा आकार 50 सेंटीमीटरपर्यंत वाढतो. समुद्रशास्त्रातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दुसरा आइयोपॉड आहे.

नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर (National University of Singapore) आणि इंडोनेशियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्सेज (Indonesian Institute of Sciences) शास्त्रज्ञांनी एकत्र या झुरळाचा शोध लावला आहे.

" isDesktop="true" id="465615" >

2018 साली इंडोनेशियाच्या पश्चिमी जावातील बॅनटेनच्या किनाऱ्याजवळ हे झुरळ पाहिलं होतं. त्यानंतर ते आता दिसलं आहे. या झुरळाच्या दिसण्यावरून शास्त्रज्ञ याला स्टार वार्स फिल्मच्या डार्थ वेडर कॅरेक्टरच्या नावानेही ओळखतात.

हे वाचा - VIDEO : चिकन नव्हे तर या डॉलीला आवडते पाणीपुरी; कशी खातेय बघा...

हा जमिनीवर झुरळाशी मिळताजुळता आहे. समुद्रातील मृत जीवांना खाऊन तो जिवंत राहतो. मात्र कित्येक दिवस त्यांना काही खायला मिळालं नाही तर ते जिवंत राहू शकतात.

First published:
top videos

    Tags: Viral