कॅनबेरा, 25 मे : सोशल मीडियावर कोणता ट्रेंड आला रे आला की तो फॉलो केला जातो. पण त्यापैकी काही ट्रेंड जीवघेणेही ठरू शकतात. अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. एका सोशल मीडिया ट्रेंडमुळे एकाचा मृत्यू झाला. सोशल मीडिया ट्रेंड फॉलो करणाऱ्या एकाचा जीव गेला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमधील ही धक्कादायक घटना आहे. 13 वर्षांच्या मुलीने सोशल मीडिया ट्रेंड फॉलो करण्याच्या नादात आपला जीव गमावला आहे. मीडिया रिपोर्टनुसार इस्रा हायनेस असं या मुलीचं नाव.
इस्राचे वडील पॉल यांनी सांगितलं की इस्रा एका सोशल मीडिया चॅलेंजदरम्यान बेशुद्ध झाल्याचा तिच्या मित्राचा फोन आला, तेव्हा आम्हाला याबाबत समजलं. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दीड आठवडा ती रुग्णालयात होती. तिच्यावर उपचार सुरू होते पण तिचा मृत्यू झाला.
Weird place name : सुअर ते काला बकरा; प्राणी नाही तर ही भारतातील ठिकाणं, कुठे आहेत इथं पाहा
इस्राने क्रोमिंग नावाचं सोशल मीडिया ट्रेंड फॉलो केलं. यात तिने एरोसोल डियो कॅन हे केमिकल श्वासावाटे घेतलं. हफिंग नावानेही हा सोशल मीडिया ट्रेंड फेमस आहे. यात लोकांना मेटेलिक पेन्ट, सोल्व्हेंट, पेट्रोल, घरगुती केमिकल्स असे खतरनाक केमिकल श्वासावाटे घ्यायला सांगितले जातात. याचा परिणाम मेंदूवर होतो आणि ते जीवघेणं ठरतं.
श्रीमंत नवरा हवा मग हा VIDEO आधी पाहाच; करोडपतीच्या पत्नीनेच सांगितले शॉकिंग 'राज'
त्यामुळे यापुढे सोशल मीडिया ट्रेंड फॉलो करताना सावधान राहा आणि तुमच्या मुलांवरही ते असे खतरनाक सोशल मीडिया ट्रेंड फॉलो करत नाहीत ना, यावर लक्ष ठेवा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Death, Social media, Viral