• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • वाईट सवय आली अंगाशी; अवघ्या 13 व्या वर्षीच मुलाचं वजन झालं 140 किलो, ठरला चर्चेचा विषय

वाईट सवय आली अंगाशी; अवघ्या 13 व्या वर्षीच मुलाचं वजन झालं 140 किलो, ठरला चर्चेचा विषय

एक मुलगा सध्या सोशल मीडियावर (Social Media) बराच चर्चेत आला आहे. या चर्चेचं कारण ठरलंय त्याचं वाढतं वजन (Overweight).

 • Share this:
  अहमदाबाद 27 जून: गुजरातमधील (Gujarat) एक मुलगा सध्या सोशल मीडियावर (Social Media) बराच चर्चेत आला आहे. या चर्चेचं कारण ठरलंय त्याचं वाढतं वजन (Overweight). या मुलाचं नाव सागर असून त्याचं वय केवळ तेरा वर्ष आहे. मात्र, या वयात त्याचं वजन 140 किलो आहे. मात्र, कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती (Financial Condition) बेताची असल्यानं त्याच्यावर उपचार करणं शक्य होत नाहीये. त्याच्या कुटुंबीयांचं असं म्हणणं आहे, की त्याला खाण्याचं फार वेड आहे आणि याच कारणामुळे त्याचं वजन इतकं वाढलं आहे. औरंगाबाद हळहळलं, शस्त्रक्रिया करताना हृदयविकाराच्या झटक्यानं डॉक्टरचा मृत्यू सागर हा गुजरातच्या अमरेलीमधील धारी परिसरातील रहिवासी आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा सागरचा जन्म झाला तेव्हा त्याचं वजन साधारण होतं. मात्र, त्याला लहानपणापासूनच वेगवेगळे पदार्थ खाण्याची आवड होती. याच कारणामुळे हळूहळू त्याचं वजन वाढत गेलं. कुटुंबीयांनी सांगितलं, की त्याची ही आवड नंतर सवयीत बदलली. यामुळे त्याच्या खाण्यावर नियंत्रण ठेवणंही कठीण होऊन बसलं. शेतात कपलचं Pregnancy Photoshoot, एका कारणाने झालं जबरदस्त VIRAL वयानुसार वजन अधिक असल्यानं सागरला भूकही जास्त लागते. कुटुंबीयांचं असं म्हणणं आहे, की त्याची भूक भागवण्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कारण त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. कुटुंबीयांनी सांगितलं, की तेरा वर्षाचा सागर दिवसभरात बाजरीच्या तब्बल आठ भाकरी खातो. सागरचे वडील शेतकरी आहेत. त्यांनाही आपल्या मुलाच्या वाढत्या वजनाबाबत काळजी वाटते. सोशल मीडियावरही अनेक लोक त्याच्या वाढत्या वजनाबाबत चिंता व्यक्त करत आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: