मराठी बातम्या /बातम्या /Viral /

12 वर्षांची चिमुरडी झाली Business Girl..! उभा केला स्वतःचा व्यवसाय, आता कमावते हजारो रुपये

12 वर्षांची चिमुरडी झाली Business Girl..! उभा केला स्वतःचा व्यवसाय, आता कमावते हजारो रुपये

ती महिन्याकाठी 76 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे कमावते. ज्या वयात इतर मुलं आपल्या आर्थिक गरजांसाठी आई-वडिलांवर अवलंबून असतात त्या वयात अॅलेक्सिस हजारो रुपयांची कमाई करत आहे.

ती महिन्याकाठी 76 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे कमावते. ज्या वयात इतर मुलं आपल्या आर्थिक गरजांसाठी आई-वडिलांवर अवलंबून असतात त्या वयात अॅलेक्सिस हजारो रुपयांची कमाई करत आहे.

ती महिन्याकाठी 76 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे कमावते. ज्या वयात इतर मुलं आपल्या आर्थिक गरजांसाठी आई-वडिलांवर अवलंबून असतात त्या वयात अॅलेक्सिस हजारो रुपयांची कमाई करत आहे.

अमेरिका, 17 डिसेंबर: शालेय जीवनात (School Days) प्रत्येकजण खेळकर असतो. अभ्यास (Study) आणि खेळ (Games) या दोनच गोष्टी मुलांना माहिती असतात. खाण्यापिण्याचा जो काही थोडाफार खर्च असतो, त्यासाठी पालकांकडून पॉकेटमनी मिळत असतो. एकूणच पैशांची चिंता, घराची जबाबदारी अशी कसलीच काळजी मुलांना नसते. मात्र, अमेरिकेतील एक 12 वर्षीय मुलगी याला अपवाद ठरली आहे. या मुलीनं चक्क स्वत:चा व्यवसाय (Business) सुरू केला आहे. अ‍ॅलेक्सिस कॅप्पा (Alexis Cappa) असं या मुलीचं नाव आहे. आपल्या हँडमेड सोपच्या व्यवसायामधून (Handmade Soap Business) ती महिन्याकाठी 76 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे कमावते. ज्या वयात इतर मुलं आपल्या आर्थिक गरजांसाठी आई-वडिलांवर अवलंबून असतात त्या वयात अ‍ॅलेक्सिस हजारो रुपयांची कमाई करत आहे.

'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात', ही म्हण अ‍ॅलेक्सिस कॅप्पानं अगदी सार्थ ठरवली आहे. तिनं लहान वयातच आपली क्षमता ओळखली आणि 2021च्या सुरुवातीला स्वतःचा साबण बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. सध्या अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये (California) राहणाऱ्या या मुलीनं आपल्या मेहनतीतून पैसे कमावण्यास सुरुवात केली आहे. अ‍ॅलेक्सिसनं अनेकांना स्वावलंबी होण्याची प्रेरणा दिली आहे.

व्यवसायासाठी आईकडून मिळवलं भांडवल

द सनच्या वृत्तानुसार, 12 वर्षीय अ‍ॅलेक्सिसनं आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी आई केटीकडून 25 हजार रुपये उसने घेतले होते. त्या मुद्दलाच्या मदतीनं तिनं घराच्या गॅरेजमध्ये साबण बणवण्याचं काम सुरू केलं. व्यवसाय सुरू केल्यानंतर पहिल्याच महिन्यात तिनं आईकडून घेतलेले पैसे परत केले. कारण लोकांना अ‍ॅलेक्सिसनं बनवलेले साबण आवडले होते आणि तिची चांगली कमाई झाली होती. आपले साबण लोकांच्या पसंतीस उतल्याचं पाहून तिनं आता मेणबत्त्या (Candles) आणि शुगर स्क्रबची (Sugar scrub) निर्मितीही सुरू केली आहे. इतकचं नाही तर तिनं आपल्या दोन भावांनादेखील रोजगार दिला आहे. 14 आणि 16 वर्षांचे असलेले तिचे दोन्ही भाऊ तिच्याकडे कर्मचारी म्हणून काम करतात.

हेही वाचा-  कुत्र्याचं जबरदस्त स्केटिंग, VIDEO पाहून घालाल तोंडात बोट

 कामाच्याबाबतीत आहे खूपच गंभीर

अ‍ॅलेक्सिसची आई केटी म्हणाली, अ‍ॅलेक्सिसमध्ये सुरुवातीपासूनच एखाद्या व्यावसायिकाचे गुण होते. तिच्याकडे एखाद्या बॉसप्रमाणं (Business Skills) सर्व गोष्टी हाताळण्याचं कौशल्य आहे. अ‍ॅलेक्सिस दर महिन्याला विविध साबणांच्या 70 बॅच तयार करते. याशिवाय लोकांच्या मागणीनुसार ती गिफ्ट बास्केटही (Soap gift baskets) बनवते. अ‍ॅलेक्सिस आणि तिच्या भावाला त्वचेची समस्या (Skin Problem) आहे. त्यामुळे त्यांनी होममेड सोप (Homemade Soap) वापरावेत असा कुणीतरी त्यांना सल्ला दिला होता. आपल्या वैयक्तीक गरजेसाठी अ‍ॅलेक्सिस साबण तयार करण्यास शिकली होती. आपण या साबणाचा व्यवसाय करू शकतो हे तिच्या लक्षात आल्यानंतर तिनं आपली कल्पना सत्यात उतरवली. अ‍ॅलेक्सिसला फक्त व्यवसायाचीच नाही तर समाजाच्या कल्याणाचीदेखील जाणीव आहे. त्यामुळेच आपली कमाई ती कच्चा माल खरेदी करण्यासाठी आणि चॅरिटीसाठी (Charity) वापरते. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ख्रिसमसच्या (Christmas) सणासाठी तिनं 10 लोकांच्या कुटुंबासाठी ख्रिसमस गिफ्ट्सदेखील खरेदी केले आहेत.

किशोरवयीन अ‍ॅलेक्सिसची व्यवयाय कौशल्यं पाहून भविष्यात ती नक्की मोठी बिझनेस वुमन होईल, अशी अनेकांना खात्री आहे.

First published:

Tags: America, Business