12 ते 20 फूट लांब, 1500 किलो वजन, मच्छिमारांच्या जाळ्यात 'गावला' देवमासा, सुटकेचा थरारक VIDEO

12 ते 20 फूट लांब, 1500 किलो वजन, मच्छिमारांच्या जाळ्यात 'गावला' देवमासा, सुटकेचा थरारक VIDEO

जाळ्यात अडकलेल्या महाकाय देवमाशाला जीवनदान देण्याचे मच्छिमारांनी ठरवले. त्यानंतर सुरू झाले रेस्यू ऑपरेशन.

  • Share this:

भाईंदर, 12 मे: मुंबईजवळील भाईंदरच्या उत्तन समुद्रात (Bhayandar Uttan beach) 10 नोटिकल अंतरावर मासेमारी करण्यासाठी गेलेल्या सहारा बोटीच्या जाळ्यात महाकाय देवमासा (whale) अडकल्याची घटना घडली होती. तब्बल 12 ते 20 फुट लांब देवमासा हा मच्छिमारांच्या जाळ्यात अडकला होता. पण, मच्छिमारांनी या देवमाशाला जीवदान दिले.

भाईंदर येथील उत्तर समुद्रात बुधवारी मासेमारी करण्यासाठी मच्छिमार गेले होते. बोटीने टाकलेल्या जाळ्यात अचानक एक भलामोठा मासा लागल्याचा अंदाज आला. मच्छिमारांनी मोठ्या उत्सुकतेनं जाळेवर ओढले असता देवमासा असल्याचे लक्षात आले.

जाळ्यात अडकलेला हाा मासा अंदाजे 15 ते 20 फुट लांब होता. एवढा मोठा मासा जाळ्यात आल्याने बोटीवरील मच्छिमारांची एकच तारांबळ उडाली. देवमाश्याचे वजन जवळपास 1500 किलो असल्याचे सांगितले जात आहे.

जाळ्यात अडकलेल्या महाकाय देवमाशाला जीवनदान देण्याचे मच्छिमारांनी ठरवले. त्यानंतर सुरू झाले रेस्यू ऑपरेशन. जाळ्यात अडकल्यामुळे देवमाशाने भयभीत झाला होता. त्यामुळे तो जाळ्यातून निघण्याचा प्रयत्न करता होता. तर दुसरीकडे सर्व मच्छिमार हे देवमाशाला सोडण्यासाठी जाळे हातात धरून होते. त्याला सोडवण्यासाठी मच्छिमारांनी 2 तास प्रयत्न केले.  दोन तासांच्या प्रयत्नानंतर अखेर मच्छिमारांनी जाळे कापून त्याची सुटका केली. जाळ्यातून सुटका होताच देवमाश्याने लागलीच समुद्रात झेप मारली आणि बघता बघता काही क्षणात देवमासा नाहीसा झाला.

देवमाशाला जीवनदान देण्याऱ्या बोटमालक डेव्हिड गऱ्या यांच्या बोटीचे आणि जाळ्याचे नुकसान झाले आहे.त्यांनी या घटनेचा व्हिडिओ तयार केला होता. त्या आधारे मत्सविभागाकडून त्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे.

Published by: sachin Salve
First published: May 13, 2021, 2:14 PM IST
Tags:

ताज्या बातम्या