कराची, 15 जानेवारी : कराचीमधील एका कुटुंबाचं नाव नुकतंच गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे. या कुटुंबाचं एकूण वय 1042 वर्ष आणि 315 दिवस आहे. सोशल मीडियावर या कुटुंबाची मोठी चर्चा सुरू आहे. कुटुंबाचं नाव डिक्रूज फॅमिली आहे. डिक्रूज कुटुंबातील या भावा-बहिणीचं वय 75 ते 97 वर्ष आहे.
कशी सुचली वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची कल्पना -
डिक्रूज कुटुंबाला गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची कल्पना 2018 मध्ये एका फॅमिली रियूनियनवेळी आली होती. या 12 भावंडांपैकी सर्वात लहान बहीण जिनीया, हिच्या भाचीला, ही कल्पना तेव्हा सुचली, ज्यावेळी तिला रियूनियनमध्ये या सर्व भावंडांचं वय समजलं. त्याचवेळी तिने गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नावं लिहिलं. त्यावेळी कुटुंबातील सर्व सदस्यांनी या गोष्टीला हसण्यावारी घेतलं.
परंतु दोन वर्षांनी म्हणजेच 2020 डिसेंबरमध्ये गिनिज वर्ल्ड रेकॉर्डकडून, कुटुंबाला एक फोन आला. आणि सांगितलं की, सर्वाधिक वय असलेल्या भावंडांचं कुटुंब म्हणून, तुमच्या कुटुंबाच्या नावे जागतिक विक्रम नोंदवला गेला आहे.
या 12 भावंडांपैकी सर्वात लहान लंडनमध्ये राहणारी बहीण जीनिया हिने एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, मला वाटायचं की गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे, सर्वात लहान किंवा सर्वात मोठी उंची असणारा व्यक्ती असतो. परंतु या यशानंतर मी अतिशय खूश असून, स्वत: ला भाग्यवान समजते की, माझं कुटुंब अद्याप हयात आहे.
डिक्रूज कुटुंब पाकिस्तानातील कराचीमध्ये जन्मलेलं होतं. परंतु वेळेसह हे कुटुंब कॅनडा, अमेरिका, स्विट्झरलँड आणि इंग्लंडला शिफ्ट झालं. परंतु वर्षातून तीन वेळा सुट्ट्यांमध्ये एकत्र भेटण्याचा या कुटुंबाचा प्रयत्न असतो. कोरोना काळात त्यांना भेटता येत नसल्याने, सर्वजण झूमच्या माध्यमातून, लंडनच्या वेळेनुसार रोज भेटत-बोलत असतात.
जीनियाने सांगितलं की, ती दिड वर्षांची असताना तिच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर त्या सर्व भावंडांना त्यांच्या आईने सांभाळलं. त्यावेळी ते सर्वजण पाकिस्तानात राहत होते, त्याची परिस्थितीही गरीब होती. या कुटुंबातील सर्वात मोठी बहीण डोरीन यांचा जन्म 1923 मध्ये झाला. तर, सर्वात छोटी बहीण जीनियाचा जन्म 1945 मध्ये झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.