मुंबई, 06 मार्च : सोशल मीडियाच्या (Social Media) जगात कधी कोणत्या गोष्टी व्हायरल (Viral) होतील हे सांगता येत नाही. या माध्यमाचा वापर कधी ट्रोलिंगसाठी केला जातो. तर कधी त्यावरील एखादी गोष्ट पाहून हसू आवरत नाही. सध्या असंच एक मजेशीर प्रकरण सर्वांच्या चर्चेचं कारण बनलं आहे.
प्रेमाची गोष्ट कबूल करण्याचं माध्यम म्हणून सोशल मीडियाचा वापर हा काही नवीन नाही. अकरावीच्या एका मुलानं असंच एका मुलीला प्रपोज केलं, जे चांगलंच व्हायरल झालं आहे. Anti Pigeon नावाच्या एका युझरनं हा स्क्रीन शॉट शेअर केला आहे.
11 वी मध्ये शिकत असलेला हा मुलानं, ‘तू खूप सुंदर आहेस. माझी गर्लफ्रेंड होशील का?’ असं एका मुलीला पहिल्यांदा विचारलं. त्यावर त्या मुलीचं काहीही उत्तर आलं नाही. पण म्हणून त्या मुलानं हार मानली नाही. त्यानं पुढं लिहलं की, ‘माझ्या वडिलांचा मोठा शिपिंग व्यवसाय आहे. मी तुझ्यासाठी काहीही करु शकतो. तू प्लीज माझी गर्लफ्रेंड हो.’
मुलीनं दिलं उत्तर
आपण दुर्लक्ष केल्यानंतरही मुलगा हार मानत नाही. इतकंच नाही तर तो आता वडिलांच्या संपत्तीच्या जोरावर आपल्याला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहे, हे पाहून मुलीला राहवलं नाही. तिनं त्या मुलाला उत्तरात लिहलं की, ‘प्लीज शाळा सुरु करा.’ ती मुलगी इतक्यावरच थांबली नाही ती पुढे म्हणाली की ‘मला या मेसेजमुळे वाईट वाटलं नाही, उलट मजा आली. हा मुलगा त्याच्या वडिलांच्या संपत्तीच्या जोरावर मला प्रपोज करत आहे.’
(हे वाचा- एवढ्याशा म्हशीनं भल्यामोठ्या हत्तीला शिंगावर धरलं आणि... पुढे काय घडलं पाहा VIDEO)
मुळ मेसेज प्रमाणेच या मुलीचं उत्तरही आता चांगलंच व्हायरल झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India, Mumbai, Social media