मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO: 'चांगले वाईट लोक सर्वत्रच...' भारताबद्दल या पाकिस्तानी मुलाचं उत्तर आणेल तुमच्या चेहऱ्यावर हसू

VIDEO: 'चांगले वाईट लोक सर्वत्रच...' भारताबद्दल या पाकिस्तानी मुलाचं उत्तर आणेल तुमच्या चेहऱ्यावर हसू

मूळचा न्यूझीलंडचा (NewZealand) असलेला यू-ट्यूबर कार्ल रॉक (Karl Rock) आग्नेय आशिया (South East Asia) आणि खासकरून भारतासंदर्भातील ट्रॅव्हलॉग, व्हिडीओ यांसाठी ओळखला जातो. सध्या रॉक पाकिस्तानात (Pakistan) आहे आणि तिथले काही व्हिडीओ तो शेअर करत आहे

मूळचा न्यूझीलंडचा (NewZealand) असलेला यू-ट्यूबर कार्ल रॉक (Karl Rock) आग्नेय आशिया (South East Asia) आणि खासकरून भारतासंदर्भातील ट्रॅव्हलॉग, व्हिडीओ यांसाठी ओळखला जातो. सध्या रॉक पाकिस्तानात (Pakistan) आहे आणि तिथले काही व्हिडीओ तो शेअर करत आहे

मूळचा न्यूझीलंडचा (NewZealand) असलेला यू-ट्यूबर कार्ल रॉक (Karl Rock) आग्नेय आशिया (South East Asia) आणि खासकरून भारतासंदर्भातील ट्रॅव्हलॉग, व्हिडीओ यांसाठी ओळखला जातो. सध्या रॉक पाकिस्तानात (Pakistan) आहे आणि तिथले काही व्हिडीओ तो शेअर करत आहे

पुढे वाचा ...

कराची, 08 जानेवारी: मूळचा न्यूझीलंडचा (NewZealand) असलेला यू-ट्यूबर कार्ल रॉक (Karl Rock) आग्नेय आशिया (South East Asia) आणि खासकरून भारतासंदर्भातील ट्रॅव्हलॉग, व्हिडीओ यांसाठी ओळखला जातो. सध्या रॉक पाकिस्तानात (Pakistan) आहे आणि त्याचे चाहते, सबस्क्रायबर्स यांच्या भेटी-गाठी घेतो आहे, त्यांच्याशी चर्चा करतो आहे. तिथले ट्रॅव्हल व्हिडीओज (Vlog) तो त्याच्या चॅनेलवरून प्रसारित करत आहे. त्याच्या म्हणण्यानुसार तो फाळणीपूर्वीच्या भारतात फिरतो आहे. त्याच्या या दौऱ्यात लाहोरमधल्या रस्त्याशेजारच्या खाद्यपदार्थाच्या स्टॉलवर त्याची गाठ 11 वर्षांच्या एका मुलाशी पडली. या मुलाचं नाव झाकियास उर्फ झॅक असं आहे. त्याने आणि त्याच्या वडिलांनी कार्लला हारिसा हा प्रसिद्ध खाद्यपदार्थ खाऊ घातला. कार्लने या व्हिडीओमध्ये झॅकशी त्याचा पाकिस्तानातला अनुभव शेअर केला, तसंच त्याच्याशी पाकिस्तानी खाद्यसंस्कृतीबद्दलही (Cuisine) चर्चा केली.

दरम्यान झॅक आणि कार्य या दोघांमध्ये भारताबद्दलही चर्चा झाली. कार्ल मूळचा न्यूझीलंडचा असला, तरी सध्या त्याचं वास्तव्य भारतातच असतं. 2013मध्ये तो पहिल्यांदा भारतात आला आणि भारताच्या प्रेमातच पडला. इथली संस्कृती, खाद्यजीवन, लोक या सगळ्याच्या तो प्रेमात पडला. एवढंच नव्हे, तर त्याने एका भारतीय महिलेशी लग्न केलं आहे. सध्या तो नवी दिल्लीत स्थायिक झाला आहे. कार्लच्या या भारतप्रेमामुळे त्याने झॅकला भारताबद्दल प्रश्न विचारणं साहजिक होतं.

(हे वाचा-स्वत:च्या मुलांपेक्षाही लहान असणाऱ्या तरुणाशी केला विवाह, पण आता होत नाहीये भेट)

आपले काही मित्र भारतात असल्याचं झॅकने सांगितलं. त्याचे वडील अनेकदा भारतात गेल्याचं, तसंच आपण सहा वर्षांचा असताना वडिलांबरोबर अमृतसरला गेलो असल्याची आठवणही त्याने सांगितली. 'भारताबद्दल तू काय विचार करतोस,' असा प्रश्न कार्लने झॅकला विचारला. त्यावर त्याने उत्तर दिलं, 'चांगले आणि वाईट लोक सगळीकडेच असतात. त्यामुळे आपण कोणाला 'जज' करू शकत नाही.' त्याचं हे उत्तर कार्लला खूप आवडलं. 'हां, सही बात है' असं उत्तर कार्लने दिलं.

(हे वाचा-प्रियांका चोप्राने UK मध्ये लॉकडाऊन नियम तोडला, आई आणि डॉगीसोबत एका सलूनला दिली)

पर्यटन, परिषदा किंवा कौटुंबिक कार्यक्रम अशा कारणांसाठी भारताला भेट  दिलेल्या अनेक पाकिस्तानी लोकांना भेटल्याचं कार्लने म्हटलं आहे. आपण ओळखत असलेले कित्येक भारतीय मात्र पाकिस्तानात गेलेले नाहीत, असंही त्याने म्हटलं आहे. त्यांनी पाकिस्तानात जरूर यावं, असं आवाहनही कार्लने आपल्या सबस्क्रायबर्सना केलं आहे.

" isDesktop="true" id="511980" >

2013मध्ये भारतात आल्यानंतर कार्लला हा देश आवडला. त्याने आपल्या अनुभवांची, प्रवासांची नोंद यू-ट्यूबद्वारे ठेवायला सुरुवात केली. काही वर्षांतच त्याचं चॅनेल परदेशी पर्यटकांसाठी हक्काचं ठिकाण बनलं. कारण त्याचे व्हिडीओ पाहून परदेशी लोक भारतात कोणकोणते अनुभव येऊ शकतात, याबद्दल माहिती घेऊ लागले. फेरीवाल्यांकडे हिंदी भाषेत घासाघीस, फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्यासाठी काय करायचं, टपरीवरच्या चहाचा आस्वाद अशा अनेक गोष्टी पाहता पाहता त्याची लोकप्रियता वाढत गेली आहे.

First published:

Tags: Pakistan, Youtube