वॉशिंग्टन, 14 डिसेंबर : एक खुनी तब्बल 37 हत्या करतो. पोलीस त्याला शोधण्यासाठी जंग-जंग पछाडतात. तो त्यांना सापडत नाही. उलट पोलिसांनाच ग्रह-ताऱ्यांच्या सांकेतिक भाषेचा वापर करत 340 शब्दांचा कोड मेसेज पाठवतो. त्यानंतर तो गायब होतो. आता य घटनेला 51 वर्ष झालेली असतात. त्यामुळे ते प्रकरण मागे पडतं. तरीही, तो कोड मेसेज काय आहे? हे शोधण्याचं काम तपास यंत्रणा करत असतात. त्यासाठी जगभरातील तज्ज्ञांची मदत घेतली जाते, आणि अखेर तब्बल 51 वर्षांनी त्या कोड मेसेजचा अर्थ उलगडण्यात तज्ज्ञांना यश मिळतं.
एखाद्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या यंत्रणांनी (Investigative agencies) ठरवलं तर त्या वाट्टेल ते करुन प्रकरण निकाली काढू शकतात याचा आणखी एक पुरावा देणारी घटना अमेरिकेत (U.S.) उघड झाली आहे. अमेरिकन पोलिसांनी अखेर ‘राशी मारेकरी’ (Zodiac Killer) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या के पजलनं हा कोड मेसेजचा पाठवला होता. अर्थ शोधण्यात यश मिळवलं असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याने 51 वर्षांपूर्वी अमेरिकन पोलीस आणि मीडियाला कोड वर्डमध्ये एक मेसेज पाठवला होता. त्या संदेशात अनेक ग्रह ताऱ्यांचा समावेश होता. पोलिसांनी जगभरातील तज्ज्ञांच्या मदतीनं त्याचा उलगडा केला. पजलने 1969 साली सॅन फ्रांसिस्को (San Francisco) शहरात 37 हत्या केल्याची कबुली दिली होती. त्याच्या गुप्त मेसेजमध्ये तो या कोडचा वापर करत असे.
काय होता कोड मेसेज?
अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि बेल्जियमच्या तज्ज्ञ इंजिनिअरच्या टीमनं पाच दशकांनतर त्या कोड मेसेजचा अर्थ शोधला आहे. “मला असं वाटतंय की तुम्ही मला पकडण्याचे जोरदार प्रयत्न करत आहात. टीव्ही शो मध्ये वर्णन केलं जात आहे तसा मी नाही. मला गॅस चेंबरची भीती वाटत नाही कारण मला त्यामुळे लवकरात लवकर स्वर्ग मिळेल’
दोन रहस्य कायम
के पजलने पाठवलेल्या मेसेजमध्ये नेमक्या कोणत्या टीव्ही शो चा उल्लेख आहे, ते अद्याप समजलेलं नाही. तसंच त्यानं स्वर्ग (Paradise) या शब्दाचं स्पेलिंग देखील चुकीचे लिहिले आहे. त्यामुळे तो त्या शब्दामधून दुसरं काही सांगत असण्याचीही शक्यता आहे.
कोण आहे के पजल?
के पजलनं 1960 च्या दशकात अमेरिकेत मोठी खळबळ माजवली होती. तो प्रसार माध्यमांना त्याच्या भविष्यातील योजनांचा मेसेज पाठवत असे. हे सर्व तो प्रसिद्धीसाठी करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अमेरिकन पोलिसांनी यापूर्वी त्याच्या शोधात एका व्यक्तीला ठार मारले होते.