हरेरे, 20 जानेवारी : कोरोनाव्हायरसने (coronavirus) जगभरात लाखो बळी घेतले आहेत. अनेक प्रसिद्ध व्यक्तींचाही मृत्यू झाला आहे. झिम्बाब्वेचे परराष्ट्र मंत्री (zimbabwes foreign minister) सिबुसिसो मोयो (sibusiso moyo) यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. स्थानिक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 61 वर्षांचे होते.
राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते जॉर्ज चरांबा यांनी बुधवारी मोयो यांचं निधन झाल्याचं सांगितलं, असं वृत्त रॉयटर्सनं दिलं आहे. मोयो हे माजी आर्मी जनरल होते. त्यावेळी सैन्यानं सत्तेत हस्तक्षेप केल्यानं सर्वाधिक कालावधीसाठी राष्ट्राध्यक्षपदी राहिलेल्या रॉबर्ट मुगाबे यांना पायउतार व्हावं लागलं होतं. 37 वर्षांच्या सत्तेनंतर ते 2017 साली सत्तेबाहेर झाले. 2019 साली त्यांचं निधनही झाले. 2017 सालीएमर्शन मननगागवा नवे राष्ट्राध्यक्ष झाले.
एमर्शन मननगागवा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मोयो यांची परराष्ट्रमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. मोयो हे अशा जनरलपैकी एक होते ज्यांना राष्ट्राध्यक्ष एमर्शन मननगागवा कॅबिनेटमध्ये आणि सत्ताधारी ZANU-PF पक्षात उच्च पदावर होते.
झिम्बाब्वे अशा आफ्रिकन देशांपैकी एक आहे, जिथं कोरोनाची कमी प्रकरणं होती पण आता अचानकपणे वाढ झाली आहे. दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाचा नवा स्ट्रेन देशात आल्याची भीती व्यक्त केली जाते आहे. कारण दक्षिण आफ्रिकेत राहणारे झिम्बाब्वेतील बहुतेक नागरिक सुट्ट्यांमध्ये आपल्या देशात परतले.
दक्षिण आफ्रिकन देशांना अद्यापही कोरोनाची लस मिळालेली नाही. जगाला कोरोना लस पुरवणाऱ्या COVAX मार्फत त्यांना लस उपलब्ध होण्याची प्रतीक्षा आहे. पण लस कधी मिळेल याबाबत अद्याप माहिती नाही.