Home /News /videsh /

YouTuber ने गर्भवती प्रेयसीला कपड्यांशिवाय तासनतास बाल्कनीमध्ये बसवलं, आणि...

YouTuber ने गर्भवती प्रेयसीला कपड्यांशिवाय तासनतास बाल्कनीमध्ये बसवलं, आणि...

यू ट्यूबरने Live प्रक्षेपण सुरू असताना आपल्या प्रेयसीला अत्यंत क्रूर वागणूक दिली.

    नवी दिल्ली, 5 डिसेंबर : आपल्या गर्भवती प्रेयसीच्या हत्येच्या आरोपाखाली एका युट्यूबरला अटक करण्यात आली आहे. यू ट्यूबरने Live प्रक्षेपण सुरू असताना आपल्या प्रेयसीला अत्यंत क्रूर वागणूक दिली. 30 वर्षांच्या रशियन तरुणावर आपल्या प्रेयसीला लाइव्ह स्ट्रीमिंगदरम्यान हायपोथर्मियाने मारण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. थेट प्रेक्षपण सुरू असताना तरुणाने हायपोथर्मियाने आपल्या प्रेयसीची हत्या केल्याबद्दल 30 वर्षीय रशियन व्यक्तीला अटक करण्यात आली. YouTuber स्टास रीफ्ले (Stas Reeflay) यांच्यावर आरोप आहे की, त्याने आपल्या गर्भवती प्रेयसी व्हॅलेंटीना ग्रिगोरिवा (Valentina Grigoryeva) हिला कपड्यांशिवाय मायनस शून्य डिग्री तापमानात घराच्या बाल्कनीत बसण्यास भाग पाडले. मॉस्कोच्या थंडीत काही तास केवळ अंतर्वस्त्रात बालकनीत बसल्याकारणाने 28 वर्षांच्या वेलेंटीनाचा मृत्यू झाला. प्रेयसीच्या नावावर फॉलोअर्सकडून मागितली आर्थिक मदत स्टास रीफ्ले नावाच्या प्रसिद्ध यूट्यूबरचं खरं नाव स्टॅनिस्लाव रेशेतनिकोव (Stanislav Reshetnikov) असं आहे. रीफ्लेने आपल्या चॅनलवर फॉलोअर्सकडून प्रेयसीच्या अशा कृतीवर दान करण्याची मागणी केली. असा आरोप आहे की लाइव्ह स्ट्रीमिंगदरम्यान यूट्यूबरने वेलेंटीनावर मिर्च स्प्रेचा वापर केला. पोलिसांनी यूट्यूबरकडे त्याच्या प्रेयसीच्या मृत्यूची चौकशी केली. या प्रकरणात कायद्याचा हवाला देत एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, फॉरेन्सिक विशेषज्ज्ञांच्या माहितीनुसार रीफ्लेच्या प्रेयसीचा हाइपोथर्मियामुळे मृत्यू झाला आहे. ज्यामुळे यूट्यूबरला कमीत कमी 2 वर्षांची शिक्षा होऊ शकते. या प्रकरणात रशिया चौकशी समितीने (Russian Investigative Committee) सांगितलं की, या प्रकरणात तत्काळ तपास सुरू झाला आहे. ज्यानुसार लाइव्ह प्रक्षेपणादरम्यान तरुणाने कायद्याचं उल्लंघन केलं आहे की नाही, याची माहिती समोर येईल. युट्यूबवर असे व्हिडीओ व फोटो दाखविणे बंद करण्याची मागणी स्त्रीवादी कार्यकर्त्या लिसा लेडरसन यांनी वेलेंटीनाला पाठिंबा दर्शविला आहे. लिसाने युट्यूबवर महिलांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ दाखवणाऱ्या वाहिन्यांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्या म्हणाल्या की, महिलांवरील हिंसाचार आणि क्रूरता यूट्यूबवर दाखविले जात आहे, जे अत्यंत निंदनीय आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Youtube, Youtubers

    पुढील बातम्या