प्रेग्नेंट गर्लफ्रेंडला विना कपड्यात YouTuber ने बाल्कनीत बसवलं; त्यानंतर जे झालं...

यूट्यूबरने त्याच्या गर्लफ्रेंडला विना कपड्यांत, मायनस झिरो डिग्री टेंप्रेचरमध्ये घराच्या बाल्कनीत बसण्यास भाग पाडलं. मॉस्कोच्या हाड गोठणाऱ्या थंडीत, अनेक तास ती बाल्कनीत केवळ अंतवर्स्त्रात बसली होती.

यूट्यूबरने त्याच्या गर्लफ्रेंडला विना कपड्यांत, मायनस झिरो डिग्री टेंप्रेचरमध्ये घराच्या बाल्कनीत बसण्यास भाग पाडलं. मॉस्कोच्या हाड गोठणाऱ्या थंडीत, अनेक तास ती बाल्कनीत केवळ अंतवर्स्त्रात बसली होती.

 • Share this:
  नवी दिल्ली, 5 डिसेंबर : एका यूट्यूबरला (YouTuber) आपल्या प्रेग्नेंट गर्लफ्रेंडच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हा यूट्यूबर एका लाईव्ह प्रसारणावेळी आपल्या गर्लफ्रेंडसोबत अतिशय क्रूरपणे वागल्याचं समोर आलं. 30 वर्षीय रशियन तरूणाला, त्याच्या गर्लफ्रेंडला लाईव्ह स्ट्रिमिंगवेळी हायपोथर्मियाने मारल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. यूट्यूबर स्टास रीफ्लेवर (Stas Reeflay) त्याची प्रेग्नेंट गर्लफ्रेंड वेलेंटीना ग्रिगोरिवाला (Valentina Grigoryeva) विना कपड्यांचं मायनस झिरो डिग्री टेंप्रेचरमध्ये घराच्या बाल्कनीत बसण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. मॉस्कोच्या हाड गोठणाऱ्या थंडीत, अनेक तास बाल्कनीत केवळ अंतवर्स्त्रात बसल्यामुळे 28 वर्षीय वेलेंटीनाचा मृत्यू झाला आहे.

  (वाचा - भयंकर! हुकुमशाहची दहशत सुरुच, कोरोनाचे नियम मोडणाऱ्याला Kim Jong Unने घातली गोळी)

  गर्लफ्रेंडच्या नावे फॉलोवर्सकडून डोनेशनची मागणी - स्टास रीफ्ले नावाच्या या प्रसिद्ध यूट्यूबरचं खरं नाव स्टॅनिस्लाव रेशेतनिकोव (Stanislav Reshetnikov) आहे. रीफ्लेने त्याच्या यूट्यूब चॅनलवर गर्लफ्रेंडशी असं वागताना, डोनेशनची मागणीही केली आहे. लाईव्ह स्ट्रिमिंगवेळी या यूट्यूबरने वेलेंटीनावर मिरचीच्या स्प्रेचा वापर केल्याचाही आरोप त्याच्यावर आहे. पोलिसांनी यूट्यूबरशी त्याच्या गर्लफ्रेंडच्या मृत्यूबाबत चौकशी केली. याप्रकरणी कायद्याच्या अंमलबजावणीचा (Law enforcement) हवाला देत, एका रिपोर्टनुसार सांगण्यात आलं की, फॉरेन्सिक तज्ञांच्या मते, रीफ्लेच्या गर्लफ्रेंडचा हायपोथर्मियामुळे मृत्यू झाला आहे. या प्रकरणी यूट्यूबरला कमीत-कमी 2 वर्षांची शिक्षा होऊ शकते.
  Published by:Karishma Bhurke
  First published: