मराठी बातम्या /बातम्या /विदेश /Youngest Mother: प्रेग्नेंट झाली होती अवघ्या 5 वर्षांची चिमुरडी, Healthy बाळाला दिला जन्म

Youngest Mother: प्रेग्नेंट झाली होती अवघ्या 5 वर्षांची चिमुरडी, Healthy बाळाला दिला जन्म

पेरू (Peru) देशात राहणाऱ्या लिना मेडिना (Lina Medina) या मुलीची कहाणी अत्यंत अविश्वसनीय आहे. ती मुलगी अवघ्या पाच वर्षांची होती, तेव्हा ती एका मुलाची आई बनली होती.

पेरू (Peru) देशात राहणाऱ्या लिना मेडिना (Lina Medina) या मुलीची कहाणी अत्यंत अविश्वसनीय आहे. ती मुलगी अवघ्या पाच वर्षांची होती, तेव्हा ती एका मुलाची आई बनली होती.

पेरू (Peru) देशात राहणाऱ्या लिना मेडिना (Lina Medina) या मुलीची कहाणी अत्यंत अविश्वसनीय आहे. ती मुलगी अवघ्या पाच वर्षांची होती, तेव्हा ती एका मुलाची आई बनली होती.

  मुंबई, 30 जून: जगभरात अनेक आश्चर्यकारक आणि अविश्वसनीय गोष्टी घडत असतात. त्याबद्दल आपल्या वाचनात किंवा ऐकण्यात आलं, तर आपल्याला ते खरं वाटतच नाही. अशीच एक कहाणी आहे पेरू (Peru) देशात राहणाऱ्या लिना मेडिना (Lina Medina) या मुलीची. ती मुलगी अवघ्या पाच वर्षांची होती, तेव्हा ती एका मुलाची आई बनली होती. त्या मुलाचं आरोग्यही अगदी चांगलं होतं. ही गोष्ट अजिबात पटण्यासारखी नसली, तरीही खरी आहे. आतापर्यंतची सर्वांत कमी वयाची आई म्हणून लिनाची नोंद झाली आहे.

  पाच वर्षांची असताना लिनाचं पोट खूपच जास्त फुगायला लागल्याचं लक्षात आलं. त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिला डॉक्टरांकडे नेलं. तपासणीनंतर डॉक्टरांना असं वाटलं, की तिच्या पोटात एखादा मोठा ट्यूमर (Tumour) विकसित झाला आहे. अधिक बारकाईने तपासणी केल्यावर असं लक्षात आलं, की लिना चक्क सात महिन्यांची गर्भवती (Pregnant) आहे. त्यानंतर थोड्याच आठवड्यांत तिने एका हेल्दी बाळाला (Healthy Son) जन्म दिला. त्या बाळाचं वजन सहा पौंड (6 lbs) म्हणजे जवळपास तीन किलो एवढं होतं. बाळाचा जन्म अर्थातच सिझेरियन (Caesarean Section) शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आला होता. कारण लिना वयाने खूप लहान असल्याने लेबर पेन्स अर्थात प्रसूतीच्या कळा सहन करू शकली नसती.

  हे वाचा-एअर होस्टेसनं उलगडली Dirty Secrets! फ्लाइटमध्ये पायलट्सकडून अनेकदा गैरवर्तन

  लिनाच्या मुलाचं नाव गेराडो असं ठेवण्यात आलं. ज्या डॉक्टरनी तिची प्रसूती केली, त्या डॉक्टरचंच नाव तिच्या मुलाला देण्यात आलं. तिची प्रसूती करताना डॉक्टर गेराडो यांच्या असं लक्षात आलं, की लिना पाचच वर्षांची असली, तरी तिचे लैंगिक अवयव पूर्णतः विकसित झालेले होते. Precocious Puberty नावाच्या दुर्मीळ विकाराने ती ग्रस्त असल्याचं लक्षात आलं. त्यामुळेच वयाच्या चौथ्या वर्षीच तिची पाळीही येऊ लागली होती.

  मुलाचे वडील कोण याबाबत माहिती नाही

  लिनाच्या मुलाचा जन्म झाल्यानंतर तिच्या वडिलांना मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती; मात्र त्यांच्याविरोधात कोणताही पुरावा न मिळाल्याने त्यांना सोडून देण्यात आलं. या घटनेला आता 80 वर्षं होऊन गेली आहेत. लिनाच्या मुलाचे वडील कोण याचा पत्ता मात्र कधीच लागला नाही.

  हे वाचा-मुलाच्या हातामध्ये फोन देणं पडलं महागात, वडिलांना कार विकून फेडावं लागलं कर्ज

  लिना ही मूल जन्माला घालणारी आतापर्यंतची सर्वांत कमी वयाची स्त्री आहे. 14 मे 1939 रोजी लिनाने गेराडोला जन्म दिला. हाडांशी संबंधित विकारामुळे वयाच्या चाळिसाव्या वर्षी, 1979 मध्ये गेराडोचा मृत्यू झाला. विकीपीडियावर विविध संदर्भांच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार, 23 सप्टेंबर 1933 रोजी जन्मलेली लिना मात्र अजूनही हयात असून, ती 87 वर्षांची आहे. 1970 साली तिने राउल जुराडो यांच्याशी लग्न केलं. त्यांच्यापासून 1972 साली तिला दुसरा मुलगा झाला.

  First published:

  Tags: Healthy bones, International, Pregnancy, Wellness