• Home
  • »
  • News
  • »
  • videsh
  • »
  • बॉक्सिंगसाठी अफगाणिस्तानातील सीमा रेझाईनं सोडला देश; तालिबानकडून मिळालेली हत्येची धमकी

बॉक्सिंगसाठी अफगाणिस्तानातील सीमा रेझाईनं सोडला देश; तालिबानकडून मिळालेली हत्येची धमकी

ऑलिम्पिक पदकाचे (Olympic Medal) स्वप्न पाहणाऱ्या सीमा रेझाई हिनं बॉक्सिंग सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त केल्यानं तालिबाननं तिला मृत्युदंडाची शिक्षा देण्याचे फर्मान काढले आहे

  • Share this:
काबूल 13 सप्टेंबर : अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केलेल्या तालिबानच्या (Taliban) क्रूर राजवटीची झलक आता दिसू लागली आहे. तालिबाननं आता तिथं आपलं काळजीवाहू सरकारही (Government) स्थापन केलं असून, लोकांना शरीयत कायद्यानुसार (Sharia Law) वर्तन करण्याची सूचना दिली आहे. नवभारत टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानमध्ये महिलांच्या स्वातंत्र्यावर (Women’s Freedom) अत्यंत कठोर निर्बंध घालण्यात येत असून, तालिबाननं महिलांना हिजाब (Hijab) म्हणजे बुरखा घालणंही सक्तीचं केलं आहे. इस्लाममध्ये (Islam) महिलांनी क्रिकेट खेळण्यास बंदी असल्याचंही तालिबाननं म्हटलं आहे. त्यामुळे क्रिकेटसह विविध खेळ खेळणाऱ्या महिला क्रीडापटूंवर तालिबानची वक्रदृष्टी पडली आहे. शरीयत कायद्यानुसार चालणाऱ्या मुलींना शाळेत जाता येईल तसंच महिलांना बाहेर काम करण्याची परवानगी दिली जाईल, असं तालिबाननं म्हटलं आहे. प्रत्यक्षात मात्र महिलांना अत्यंत क्रूर वागणूक दिली जात आहे. अनेक फतवे जारी केले जात असून, नियमांना विरोध करणाऱ्यांना क्रूरपणे शिक्षा केली जात आहे. निर्दयी तालिबान, मुलांसमोरच केली सैनिकाची गोळी घालून हत्या तालिबानच्या सक्तीला विरोध करणाऱ्या व्यक्तींना यमसदनी धाडले जात आहे. त्यांना मृत्युदंडाची शिक्षा (Death Threat) सुनावल्याचे फर्मान काढण्यात येत आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांना देश सोडून जाण्याची वेळ आली आहे. त्यापैकीच एक आहे बॉक्सर (Boxer) सीमा रेझाई (Seema Rezai). वयाच्या 16व्या वर्षी बॉक्सिंग करिअरची सुरुवात करणाऱ्या आणि ऑलिम्पिक पदकाचे (Olympic Medal) स्वप्न पाहणाऱ्या सीमा रेझाई हिनं बॉक्सिंग सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त केल्यानं तालिबाननं तिला मृत्युदंडाची शिक्षा देण्याचे फर्मान काढले आहे. त्यामुळे या गुणवान युवा खेळाडूला आपला देश सोडून दुसऱ्या देशात आश्रय घ्यावा लागला आहे. सध्या ती कतारमध्ये (Qatar) असून, अमेरिकेला (USA) जाण्याची वाट पाहत आहे. तालिबानच्या फतव्याबाबत तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत माहिती दिली. तालिबाननं काबूलवर (Kabul) कब्जा केला, तेव्हा सीमा आपल्या पुरुष प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण घेत होती. तालिबानला हे कळल्यानंतर तालिबाननं तिला प्रशिक्षण बंद कर नाहीतर तुला ठार केलं जाईल, अशी धमकी दिल्याचं सीमा रेझाईनं सांगितलं. सीमानं आपला खेळ न सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी तिला आपली मातृभूमी सोडून दुसरीकडे जावं लागलं. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अफगाणिस्तान सोडण्याचा निर्णय घेणारी सीमा रेझाई आता अमेरिकन व्हिसाची वाट पाहत असून, अमेरिकेत जाऊन आपलं बॉक्सिंग करिअर घडवण्याचे स्वप्न ती पहात आहे. नशीब! तालिबाननं घेतला मोठा निर्णय, 'तो' सोहळा केला रद्द तालिबानच्या अशा संकुचित विचारसरणीच्या, क्रूर राजवटीमुळे अफगाणिस्तानातील महिलांचे अस्तित्व धोक्यात आलं आहे. तालिबानच्या राजवटीत सर्वाधिक धोका महिलांना असल्यानं लाखो नागरिक देश सोडून अन्य देशांमध्ये आश्रय घेत आहेत. आधुनिक काळात जगातील सर्व महिला पुरुषांच्या बरोबरीनं आपलं कतृत्व सिद्ध करून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व ठळकपणे दाखवून देत असताना, तालिबान मात्र आपल्या देशातील महिलांच्या आकाक्षांचे पंख छाटून त्यांना बुरख्यात बंदिस्त करत आहे.
First published: