मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

किळसवाणा प्रकार! डिलिव्हरीसाठी रुग्णालयात होती तरुणी; प्रियकराची सासूसोबत सुरू झाली Love Story

किळसवाणा प्रकार! डिलिव्हरीसाठी रुग्णालयात होती तरुणी; प्रियकराची सासूसोबत सुरू झाली Love Story

तरुणीने स्वत: तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे..

तरुणीने स्वत: तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे..

तरुणीने स्वत: तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे..

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर : दोन मुलांच्या आईने आपल्या प्रियकरावर (Boyfriend) नात्यात फसवणूक केल्याचा आरोप लावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 3 वर्षे जुन्या प्रकरणात महिलेने आपला प्रियकर आणि आईमध्ये अनैतिक संबंध असल्याचा खुलासा केला आहे. 21 वर्षीय महिलेचं नाव एलिसा हॅरिसन (Alyssa Harrison) आहे. एलिसाचं म्हणणं आहे की, तिचा मुलगा फ्लिनच्या जन्माच्या वेळी तिचा प्रियकर आणि आईमध्ये अनैतिक संबंध सुरू झाले आहे.

7 वर्षांपासूनच्या प्रेमावर सवाल केला उपस्थित

एलिसाने सांगितलं की, ती गेल्या 7 वर्षांपासून प्रियकर रॉयन विलियम्स (Ryan Williams) याला डेट करीत होती. या प्रकरणासंबंधित एलिसाने एक व्हिडीओ टिकटॉकवर (Viral Video) शेअर केला आहे. एलिसाने सांगितलं की, 'रॉयन खूप रोमँटिक होता. आम्ही एकमेकांपासून दूर राहू शकत नव्हतो. मात्र त्याने माझा विश्वास घात केला. मी त्याला कधीच माफ करू शकत नाही. जेव्हा मी त्याची चोरी पकडली, त्यानंतर त्याने रडत रडत माझ्यासमोर हात जोडले आणि सोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर मी त्याला माफ केलं. (young woman was in the hospital for delivery love story started between boyfriend and mother in law)

1 कोटी लोकांपर्यंत पोहोचली ही कहाणी

यूकेमध्ये राहणाऱ्या एलिसाला प्रेमात धोका मिळाला आहे. आतापर्यंत तिचा हा व्हिडीओ एक कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे. द मिररमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, याबद्दल सांगताना एलिसा म्हणाली की, जेव्हा मी आईच्या खोलीचं फुटेज पाहिलं तर मला मोठा धक्का बसला. मला मोबाइलमधूनही असे अनेक पुरावे मिळाले, ज्यावरुन माझी आई आणि प्रियकराचे शारिरीक संबंध होते. फोनच्या गॅलरीत मला दोघांचे न्यूज फोटोही दिसले. हे सर्व त्या दिवसात घडलं जेव्हा मला गर्भकळा सुरू झाल्या होत्या व डिलिव्हरीसाठी मी रुग्णालयात भरती झाले होते. मी बरेच दिवस घराबाहेर होते. घरी आल्यानंतर जेव्हा मी सर्व पुरावे रॉयनला दाखवले तेव्हा त्याने त्याची कबुली दिली.

हे ही वाचा-OMG! पतीपासून वेगळं झाल्यानंतर ती बनली ब्रिटनच्या महाराणीपेक्षाही श्रीमंत

प्रियकर आणि आई..दोघांशी तोडलं नातं

एलिसाने सांगितलं की, अनेक वेळा त्यांना रंगेहात पकडल्यानंतर त्यांच्या वागणुकीत बदल झाला नाही. त्यामुळे मी पुरते तुटले होते. यानंतर या सर्व प्रकारासाठी मी स्वत:लाच दोषी ठरवित होते. या सर्व प्रकाराला वैतागून शेवटी गेल्या वर्षी नोव्हेंबर 2020 मध्ये तिने आई आणि रॉयन याच्याशी नातं तोडण्याचा निर्मय़ घेतला.

First published:

Tags: Pregnancy, Shocking news