मिशिगन, 21 डिसेंबर : आजकालची तरुणाई मोबाईल आणि व्हिडिओ गेम्सला एवढी चिकटली आहे, की त्यांच्या आजूबाजूला काय चालू असतं याच भानही त्यांना उरलं नाही. व्हीडिओ गेम्स सतत खेळल्यामुळं त्यांची सहनशीलता कमी होत आहेत, असा निष्कर्ष काढणारी अनेक संशोधनं झाली आहेत. तसेच व्हिडिओ गेम्स किंवा मोबाईल न दिल्यानं देशातील काही अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केल्याच्या किंवा एखाद्याची हत्या केल्याच्या अनेक घटनाही समोर आल्या आहेत.
अशीच एक घटना मिशीगन येथे घडली आहे. येथील एका तरुणानं व्हिडिओ गेम खेळू न दिल्यानं आपल्या वृद्ध मात्या-पित्याची हत्या केली आहे. या आरोपी तरुणाचं नाव क्रिस्तोफर मैक्कने असं असून त्याचं वय 29 वर्ष एवढं आहे. त्यानं आपली जन्मदाती आई आणि सावत्र वडिलांची चाकूनं भोकसून हत्या केली. आपली आई आणि वडील रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतरही हा निर्दयी तरुण शेजारच्यांकडे फिरून आला होता, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.
नेमकं प्रकरण काय आहे?
क्रिस्तोफरच्या आईचं वय 66 वर्ष होतं तर त्याचे सावत्र वडील 71 वर्षांचे होते. या दोघांना झोपायचं होतं. त्यावेळी क्रिस्तोफर व्हिडिओ गेम खेळत होता. या दोघांनी त्याला गेम बंद करायला सांगितलं. पण तो गेम मध्ये एवढा मग्न होता, की गेम बंद करायला नकार दिला. यानंतर त्याच्या आई वडीलांनी संतापून त्याला पून्हा एकदा गेम बंद करायला सांगितली. मात्र यावेळी त्याचा रागाचा पारा वर चढला आणि त्यानं त्याच्या आईच्या नाकावर बुक्की मारली नाक मारली, ज्यामुळं या महिलेचं नाक मोडलं.
यानंतर त्यानं आपल्या सावत्र बापाला बेदम मारहाण केली. त्यामुळ सावत्र बापानं स्वत: ला आणि आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी स्वयंपाकघरात गेला आणि तेथून चाकू घेऊन आला. पण चाकू घेऊन येणं या दोन्ही जोडप्यांच्या जीवावर बेतलं आहे. कारण गेम्सच्या आहारी गेलेल्या या तरुणानं आपल्या वडीलांच्या हातातला चाकू हिसकावून घेतला आणि त्यांच्यावरचं हल्ला चढवला. या हल्ल्यात हे दोघेही गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.