मराठी बातम्या /बातम्या /विदेश /बापरे! आत्महत्येसाठी 9 व्या मजल्यावरुन मारली उडी; या एका गोष्टीमुळे तरुणाचा वाचला जीव

बापरे! आत्महत्येसाठी 9 व्या मजल्यावरुन मारली उडी; या एका गोष्टीमुळे तरुणाचा वाचला जीव

एकीकडे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे, तर दुसरीकडे अनेकजण हे वृत्त वाचून हैराण झाले आहेत.

एकीकडे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे, तर दुसरीकडे अनेकजण हे वृत्त वाचून हैराण झाले आहेत.

एकीकडे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे, तर दुसरीकडे अनेकजण हे वृत्त वाचून हैराण झाले आहेत.

अमेरिका, 8 ऑक्टोबर : जर एखादी व्यक्ती 9 व्या मजल्यावरुन खाली पडली तर त्याचा मृत्यू होण्याची 100 टक्के शक्यता असते. मात्र अमेरिकेतील एका शहरात इमारतीच्या 9 व्या मजल्यावरुन खाली उडी मारल्यानंतरही तरुणाचा मृत्यू (young man did not die even after jumping down from the 9th floor) झाला नाही. 9 व्या मजल्यावरुन खाली कोसळणारी व्यक्ती पार्किंगला उभी असणाऱ्या बीएमडब्यू (BMW CAR) कारवर पडला. त्यामुळे त्याचा जीव वाचला. हे वृत्त वाचून लोक हैराण झाले.

ही घटना बुधवारी 26 जर्नल स्कॉवयर येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, स्मिथ नावाच्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, पहिल्यांदा तर मला मोठा आवाज ऐकू आला. त्यावेळी कोणी व्यक्ती पडल्याचा विचारही माझ्या मनात आला नाही. त्यावेळी कारच्या मागील काचा तुटल्या होत्या. जी व्यक्ती कारवर पडली होती, ती वेदनेने ओरडत होती. त्याचा एक हात पूर्णपणे वळला होता. हे अगदी एखाद्या चित्रपटातील दृश्य वाटावं असं होतं. यानंतर स्मिथने तातडीने पोलिसांनी कॉल करून या घटनेची माहिती दिली.

हे ही वाचा-मेट्रोच्या खाली 68 वर्षीय महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; थोडक्यात वाचला जीव

दुसऱ्या एका रिपोर्टनुसार, या व्यक्तीने जेथून उडी मारली होती, त्याची उंची साधारण 100 फूट होती. ज्यात त्याच्या शरीराच्या वरच्या भागावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या. धक्कादायक म्हणजे 9 व्या मजल्यावरुन कारवर पडल्यानंतरही ही व्यक्ती स्वत:च उठण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र लोकांनी त्याची परिस्थिती पाहता त्याला रोखलं. जेव्हा पोलीस रुग्णवाहिका घेऊन आली, तेव्हा ती व्यक्ती, मला मरायचं (Attempted suicide) असल्याच म्हणत होता. या व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

तेथे उपस्थित असलेल्या मार्कने याबद्दल सांगितलं. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे. एकीकडे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे, तर दुसरीकडे अनेकजण हे वृत्त वाचून हैराण झाले आहेत. इतक्या उंचावरुन उडी मारल्यानंतर कोणी कसं काय जिवंत राहू शकतं असा सवाल उपस्थित केला जात आहे.

First published:

Tags: America, Crime, Suicide attempt