महिलांसाठी Dating App चालवणाऱ्या कंपनीची CEO ठरली जगातील सर्वात तरुण अब्जाधीश!

महिलांसाठी Dating App चालवणाऱ्या कंपनीची CEO ठरली जगातील सर्वात तरुण अब्जाधीश!

नलाइन डेटिंग अॅप 'बंबल'च्या माध्यमातून लोकांना त्यांचे प्रेम मिळवून देणारी 31 वर्षीय संस्थापक आणि सीईओ व्हिटनी बोल्फ हेर्ड ही जगातील सर्वात कमी वयाची महिला अब्जाधीश ठरली आहे

  • Share this:

अमेरिका ,13 फेब्रुवारी :  ऑनलाइन डेटिंग अॅप 'बंबल'च्या माध्यमातून लोकांना त्यांचे प्रेम मिळवून देणारी 31 वर्षीय संस्थापक आणि सीईओ व्हिटनी बोल्फ हेर्ड ही जगातील सर्वात कमी वयाची महिला अब्जाधीश ठरली आहे. गुरुवारी अमेरिकेच्या बाजारामध्ये लिस्ट होणारी बंबल ही दुसरी सर्वात मोठी डेटिंग कंपनी ठरली आहे. व्हिटनी बोल्फ हेर्ड या कंपनीतील आपल्या 12 टक्के वाट्यासोबत सर्वात कमी वयाची अब्जाधीश झाली आहे.

कंपनीचे बाजार मूल्य 1 लाख कोटींपेक्षा जास्त -

अमेरिकी स्टॉक एक्सचेंज नॅस्डॅकवर (NASDAQ) बंबलच्या स्टॉक आपल्या किंमतीच्या 76.78 टक्के प्रीमियमवर सूचीबद्ध झाला. कंपनीचे स्टॉक्स आज आपल्या लिस्टिंग डेवर 76 डॉलर प्रति शेअरवर उघडले.  आयपीओमध्ये त्याची किंमत 43 डॉलर होती. या बम्पर लिस्टिंगमुळे कंपनीचे बाजार मूल्यांकन 14 अब्ज डॉलर म्हणजे 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे.

हे ही वाचा-कस्टमरच्या Ex बॉयफ्रेंडच्या चेहऱ्यावर फेकला चहा, डिलिव्हरी बॉयचा VIDEO VIRAL

व्हिटनी आधी डेटिंग अॅप टिंडरची सह-संस्थापक होती -

व्हिटनी बोल्फ हेर्ड आधी बंबलचं प्रतिस्पर्धी डेटिंग अॅप टिंडरची (Tinder) सह-संस्थापक होती. तिने टिंडरच्या संस्थापकावर लैगिंक छळाचा आरोप केला होता आणि त्यानंतर कंपनीतून राजीनामा दिला होता. तिने सांगितलं होतं की, तिचा आधीचा बॉस आणि बॉयफ्रेंड जस्टिन मेटेनने तिला टिंडरचे सह-संस्थापक पद हिसकावून घेण्याची धमकी दिली होती. त्यानंतर टिंडरने या सर्व आरोपांचे खंडन करत सांगितलं होतं की, हे प्रकरण आता मिटवण्यात आले आहे. त्याच वर्षी 2014 मध्ये व्हिटनीने बंबल अॅपची सुरुवात केली. 2019 मध्ये 3 अब्ज डॉलर्समध्ये Blackstone Inc कंपनीने बंबलमधील मेजॉरिटी स्टेक खेरदी केला आणि व्हिटनी त्याची सीईओ झाली.

इतर डेटिंग अॅप्सपेक्षा बंबल वेगळं का आहे?

बंबल असं डेटिंग अॅप आहे ज्यामध्ये महिला प्रथम पुढाकार घेतात आणि त्या कोणाला डेट करायचे हे ठरवतात. बंबलचे जगभरात 4 कोटींपेक्षा जास्त मासिक सक्रिय वापरकर्ते आहेत. त्यापैकी 25 लाखांपेक्षा अधिक पेइंग अॅक्टिव्ह युजर्स आहेत. म्हणजे ते या अॅपच्या सेवेसाठी पैसे देतात. या कंपनीचा प्रसार जगातील 150 पेक्षा अधिक देशांमध्ये झाला आहे. या कंपनीला प्रत्येक पेइंग युजर्सकडून सरासरी 26.84 डॉलर महसूल मिळतो. ही कंपनी बंबल व्यतिरिक्त Badoo अॅप देखील चालवते.

Published by: Aiman Desai
First published: February 13, 2021, 9:10 PM IST
Tags:

ताज्या बातम्या