Elec-widget

'माझ्या ठिकाणी तुम्ही असता तर हार्ट अटॅक आला असता'; पंतप्रधानांनी व्यक्त केली हतबलता!

'माझ्या ठिकाणी तुम्ही असता तर हार्ट अटॅक आला असता'; पंतप्रधानांनी व्यक्त केली हतबलता!

पाकिस्तानच्या पंतप्रधांनानी आपली हतबलता व्यक्त केली आहे.

  • Share this:

न्यूयॉर्क, 25 सप्टेंबर: एखाद्या देशाचे पंतप्रधान होणे ही काही साधी गोष्ट नसते, पण हेच पद अनेक वेळा काटेरी देखील असते. काही देशांमध्ये इतके प्रश्न असतात की त्यांच्या प्रमुखांना प्रचंड तणावाखाली रहावे लागते. अशाच प्रकारच्या तणावाखाली असेलल्या सांगत पाकिस्तानच्या पंतप्रधांनानी आपली हतबलता व्यक्त केली आहे.

पाकिस्तान(Pakistan)सारख्या देशाचे पंतप्रधानपद सांभाळणे ही साधी गोष्ट नाही. एका कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan)यांनी आपण प्रचंड तणावाखाली असल्याचे सांगितले. इतक नव्हे तर माझ्या ठिकाणी अन्य कोणी असते तर त्याला हार्ट अटॅक आला असता, असे खान म्हणाले. खान यांच्या या वक्तव्यावरून हे स्पष्ट झाली आहे की, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या त्यांना करण्याची इच्छा असून देखील करता येत नाही. सध्या संयुक्त राष्ट्र महासंघाच्या महासभेसाठी अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये आलेल्या खान यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना स्वत: किती तणावाखाली आहोत हे सांगितले.

पाकिस्तानमध्ये इतक्या अडचणी सुरु आहेत त्यामुळे मी सतत काळजीत असतो. मी काय करू, एका बाजूला अफगाणिस्तानमध्ये अडचणी सुरु आहेत. इराणमध्ये काही प्रश्न आहेत. चीन देखील आमच्यावर रागावला आहे आणि आता तर भारतासोबत देखील अडचणी सुरु आहेत. जर माझ्या ठिकाणी तुम्ही असता तर नक्कीच हार्ट अटॅक आला असता, असे खान म्हणाले. हे सर्व हाताळण्याची ताकद क्रिकेट खेळल्यामुळे मिळते. क्रिकेट खेळत असताना आलेल्या अडचणी आणि तेव्हा घेतलेल्या मेहनतीमुळे मी सध्या ठिक आहे. सध्या असलेल्या पाकिस्तानमधील अडचणींचा सामना करण्यासाठी मी जोरदार प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.

माझ्याकडे अधिकारच नाहीत...

काऊंसिल ऑफर फॉरेन रिलेशन्स अफेयर्स येथील कार्यक्रमता बोलताना इम्रान खान यांनी त्यांची हतबलता देखील व्यक्त केली. अनेक समस्या सोडवण्यासाठी माझ्याकडे अधिकारच नाहीत. जसे अधिकार चीनमधील सत्ताधाऱ्यांकडे आहेत तसेच अधिकार माझ्याकडे नसल्याचे खान यांनी सांगितले. चीन ज्या पद्धतीने प्रगती करत आहे. कोट्यावधी नागरिक गरिबीतून बाहेर आले आहेत. जर माझ्याकडे चीनमधील सत्ताधाऱ्यांप्रमाणे अधिकार असते तर पाकिस्तानमधील भ्रष्ट्राचार संपेल आणि देश प्रगतीपथावर येईल.

Loading...

या कार्यक्रमात बोलताना इम्रान खान यांनी पुन्हा एकदा काश्मीर प्रश्नावर अन्य देशांना मध्यस्थी करण्याची मागणी केली. दोन्ही देशांकडे अणू बॉम्ब आहेत. जर या दोन देशात काही झाले तर त्याचा परिणाण संपूर्ण दक्षिण आशियावर होईल.

ईडीकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: imran khan
First Published: Sep 25, 2019 10:01 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...