S M L

'कॉम्रेड'च करू शकतात चीनमध्ये वीर्यदान!

चीनमध्ये लोकसंख्या वाढवण्याची आज नितांत गरज आहे. त्यांच्याकडे युवकांची लोकसंख्या कमी आहे. म्हणून लोकसंख्या वाढवण्यासाठी वीर्यदानाची मोठी चळवळ पेनकिंग विद्यापीठाच्या स्पर्म बॅंकेनी सुरू केली आहे. ही चळवळ मेपर्यंत चालणार आहे

Chittatosh Khandekar | Updated On: Apr 6, 2018 04:26 PM IST

'कॉम्रेड'च करू शकतात चीनमध्ये वीर्यदान!

06 एप्रिल :  चीनमध्ये जर वीर्यदान करण्यासाठी  कम्युनिस्ट असणं बंधनकारक आहे असा फतवाच चीनच्या स्पर्म बॅँकेने काढला आहे.   वीर्यदानासाठी असलेल्या प्राथमिक गरजांमध्ये तब्येत चांगली असणं, कुठलाही अनुवांशिक आजार नसणं यासोबतच कम्युनिस्ट असणं गरजेचं आहे असा स्पष्ट नियमच या बॅंकेने काढला आहे.

चीनमध्ये लोकसंख्या वाढवण्याची आज नितांत गरज आहे. त्यांच्याकडे युवकांची लोकसंख्या कमी आहे. म्हणून लोकसंख्या वाढवण्यासाठी  वीर्यदानाची मोठी चळवळ पेनकिंग विद्यापीठाच्या स्पर्म बॅंकेनी सुरू केली आहे. ही चळवळ मेपर्यंत चालणार आहे. पुढे जन्माला येणारा नागरिक हा जन्मापासूनच कम्युनिस्ट असावा असा बहुतेक चीन सरकारचा मनसुबा आहे. म्हणून फक्त कम्युनिस्टच इथे वीर्यदान करू शकतात. सध्या कम्युनिस्ट विचारधारेच्या प्रचार आणि प्रसारासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. आता हा प्रकार सुद्धा त्याचाच भाग आहे का अशी शंका उपस्थित होते.

गंमत म्हणजे  दान करणाऱ्याची शारीरिक तपासणी मात्र चोख केली जाते आहे पण तो कम्युनिस्ट  आहे की नाही  याची कुठलीही चाचपणी केली जात नाहीय. या बॅंकेचा हा नियम सर्वत्र ट्रोलही केला जातोयत्यामुळे चीनची येणारी पुढची पिढी आता कम्युनिस्ट आहे का  हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 6, 2018 04:26 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close