मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

इटलीच्या या गावात मिळतंय 90 रुपयांत घर; अट फक्त एकच...

इटलीच्या या गावात मिळतंय 90 रुपयांत घर; अट फक्त एकच...

इटलीच्या (Italy) कास्त्रोपिगनानो या गावाने केवळ 90 रुपयांमध्ये घर उपलब्ध करुन दिले जाईल अशी घोषणा केली आहे.

इटलीच्या (Italy) कास्त्रोपिगनानो या गावाने केवळ 90 रुपयांमध्ये घर उपलब्ध करुन दिले जाईल अशी घोषणा केली आहे.

इटलीच्या (Italy) कास्त्रोपिगनानो या गावाने केवळ 90 रुपयांमध्ये घर उपलब्ध करुन दिले जाईल अशी घोषणा केली आहे.

08 डिसेंबर, रोम: केवळ 90 रुपयांत गावामध्ये मिळते घर.. जरा आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. इटली (Italy) या देशातील मोलिझे भागातील मध्ययुगीन काळातील असलेल्या कास्त्रोपिगनानो या गावाने केवळ 90 रुपयांमध्ये घर उपलब्ध करुन दिले जाईल अशी घोषणा केली आहे. मात्र यासाठी अट मात्र इतकीच आहे की जी व्यक्ती येथे घर खरेदी करेल त्याला संबंधित घराची दुरुस्ती करावी लागेल आणि त्यानंतर त्या घरात रहावं लागेल.

इटलीतील कास्त्रोपिगनानो या गावाने 90 रुपयांत घर देण्याची घोषणा केली आहे. मोलिझे भागातील या गावाची लोकसंख्या केवळ 900 आहे. त्यामुळे येथील रिकाम्या किंवा पडून असलेल्या घरांसाठी येथील प्रशासनाने एक योजना लाँच केली आहे. प्रशासनाने या गावात राहण्यासाठी इच्छूक असणाऱ्यांना 1 युरो म्हणजेच 90 रुपयांत घर देण्याची योजना सुरु केली आहे. यासाठी फक्त एकच अट आहे आणि ती म्हणजे घर खरेदी करणाऱ्यास संबंधित घराची दुरुस्ती करावी लागेल आणि नंतर तेथे राहवे लागेल.

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, एवढ्या स्वस्तात घर विकणारं कास्त्रोपिगनानो हे जगातील एकमेव गाव ठरलं आहे. दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर येथील अनेक नागरिक गाव सोडून जाऊ लागले. 1960 नंतर येथील युवकांनी रोजगार तसेच अन्य कारणांमुळे गाव सोडले. आज या गावात राहणारे सुमारे 60 टक्के लोक हे 70 पेक्षा अधिक वयाचे आहेत. प्रशासन आता पुन्हा हे गाव नव्याने वसवू इच्छित आहे. त्यामुळे प्रशासनाने अशा प्रकारची योजना आखली आहे.

यापूर्वीच रिकामी घरे असलेल्या मालकांना नोटिसा पाठवल्या आहेत. जर या मालकांनी आपल्या घरांची दुरुस्ती केली नाही तर सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासन त्यांच्या घरांचा ताबा घेईल, असे नोटिसांमध्ये म्हटले आहे. हे गाव स्कि रिसॉर्ट आणि समुद्रकिनाऱ्यावर असल्याने ही योजना नक्कीच यशस्वी होईल असा विश्वास प्रशासकीय अधिकाऱ्यांना आहे.

पहिल्या टप्प्यात कास्त्रोपिगनानो येथील 100 घरे विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. नियमानुसार घर खरेदीनंतर संबंधित व्यक्तीस तीन वर्षांच्या आत घराची दुरुस्ती करणे बंधनकारक आहे. जर संबंधित खरेदीदाराने तीन वर्षांत घर दुरुस्ती केली नाही तर त्याला ते घर परत करावे लागणार आहे. घर खरेदी करताना खरेदीदारास 2000 युरो (1,78, 930 रुपये) गॅरेंटी म्हणून जमा करावे लागणार आहेत. घराची दुरुस्ती केल्यानंतर ही रक्कम संबंधित खरेदीदार परत केली जाणार आहे.

स्थलांतरित झालेले नागरिक पुन्हा गावाकडे परतावेत यासाठी मोलिझे क्षेत्रातील अनेक गावे, शहरांनी यापूर्वी अशी योजना जाहीर केली होती. मात्र कास्त्रोपिगनानो या गावाने घरांची जी किंमत जाहीर केली आहे त्या तुलनेत अन्य गावांमधील घरांची किंमत अधिक होती. या गावांनी जवळपास 25 हजार युरो (22,36,280 रुपये) अशी घर विक्रीची किंमत जाहीर केली होती.

First published:

Tags: Viral news