यामाहाने लाँच केली 'तीनचाकी' बाइक

यामाहाने लाँच केली 'तीनचाकी' बाइक

या बाइकचं वैशिष्ट्य असं की बाईकच्या मागच्या बाजूला एक चाक आणि पुढच्या बाजूला दोन चाक आहेत. यामाहा कंपनीने मागच्या महिन्यात टोकियोमध्ये आयोजित केलेल्या 45व्या बाइक शोमध्ये या गाडीची झलक सगळ्यांना दाखवली होती

  • Share this:

10 नोव्हेंबर: यामाहा कंपनीची तीन चाकी बाईक लवकरच बाजारात येणार आहे. यामाहाची तीन चाकं असलेली सुपरबाइक 'निकेन' 2018 पर्यंत बाजारात येणार आहे.

या बाइकचं वैशिष्ट्य असं की बाइकच्या मागच्या बाजूला एक चाक आणि पुढच्या बाजूला दोन चाकं आहेत. यामाहा कंपनीने मागच्या महिन्यात टोकियोमध्ये आयोजित केलेल्या 45व्या बाइक शोमध्ये या गाडीची झलक सगळ्यांना दाखवली होती. त्यावेळेस कंपनीने 'निकेन' बाइकबद्दल कोणतीही डिजिटल माहिती सांगितली नव्हती.

6 नोव्हेंबरला इटलीच्या मिलानमध्ये झालेल्या ईआयसीएमए या बाइक शोमध्ये निकेनबद्दल थोडीफार माहिती देण्यात आली होती.

'ultimatemotorcycling.com' या वेबसाइटच्या माहितीनुसार, या 3 चाकी बाइकमध्ये एमटी-09 हे अर्धा इंच मोठं असून ते 21.7 इंच लांब आहे. अॅल्युमिनियम स्विंगमर्मपासून बनवला आहे.

ही बाइक 115 हॉर्स पॉवरने धावते. 10,000 आरपीएम निर्मिती करण्याची क्षमता या बाइकमध्ये आहे.त्यामुळे ही बाईक आता बाजारात येईपर्यंत सगळ्या बाईक प्रेमींची उत्सुकता ताणली जाणार आहे.

'निकेन' बाइकची वैशिष्ट्ये...

- यामाहा निकेन 2018 पर्यंत बाजारात उपलब्ध होईल.

- ही मोठ्या लीनिंग मल्टीव्हील तंत्राद्वारे बनवलेली आहे.

- या तंत्रामुळे बाइकची पकड पक्की होते आणि स्पीडने गाडी चालवल्यास गाडीवर नियंत्रण ठेवता येतं.

- या सुपरबाइकमध्ये 16.1 इंचांच्या  दोन चाकांचा समावेश आहे.

- यामाहा निकेन मध्ये 847 सीसीचे इंजिन आहे, ज्यामध्ये थंड पाण्याचे 3 इनलाइन सिलेंडर आहेत.

- या बाइकचे इंजिन यामाहाच्या एमटी-09 च्या बाइकवरून घेतले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 10, 2017 12:01 PM IST

ताज्या बातम्या