मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

शाओमीचा धमाका, सेल सुरू होताच 11 मिनिटांमध्ये विकले गेले 10 हजारांपेक्षा जास्त फोन

शाओमीचा धमाका, सेल सुरू होताच 11 मिनिटांमध्ये विकले गेले 10 हजारांपेक्षा जास्त फोन

चीनमध्ये तीन महिने लॉकडाऊनची स्थिती होती. सगळे व्यवहार बंद होते. अशा परिस्थितीत गेल्या काही दिवसांपासून चीनने आपली अर्थव्यवस्था पुन्हा खुली केली आहे.

  • Published by:  Priyanka Gawde
बीजिंग 14 मे: जगभर कोरोनाने धुमाकूळ घातलाय. सर्व जगात आर्थिक मंदी आलीय. बाजारात पैसाच नाही अशा परिस्थितीत चीनची दिग्गज कंपनी असलेल्या शाओमीने आपला नवा फोन लाँच केलाय. Redmi K30 5G सीरिजमधले फोन आज लाँच केले. सेल सुरू होताच लोकांनी घरेदीसाठी ऑनलाईन झुंबड केली आणि 11 मिनिटांमध्ये 10 हजारांपेक्षा जास्त फोन विकले गेले. या फोनची किंमत १ हजार ८९९ युआन म्हणजेच २० हजार ३०० रुपये एवढी आहे. इकॉनॉमी रेंजमध्ये असलेला हा फोन इतर फोनच्या मानाने चांगला मानला जातोय. त्यातच हा फोन 5G पुरक असल्याने नव्या पीढीचा फोन समजला जातो. या स्मार्ट फोनमध्ये क्वलकॉम स्पॅनड्रॅगन 768G हे प्रोसेसर आहे. 765G या प्रोसेसरचेच नवं व्हर्जन आहे. याची स्क्रिनही मोठी असून गेमिंगसाठीही अनेक नवे फिचर्स या फोनमध्ये देण्यात आले आहेत. चीनमध्ये तीन महिने लॉकडाऊनची स्थिती होती. सगळे व्यवहार बंद होते. अशा परिस्थितीत गेल्या काही दिवसांपासून चीनने आपली अर्थव्यवस्था पुन्हा खुली केली आहे. अनेक कारखाने सुरू झाले असून परिस्थीती पूर्वपदावर येत असल्याचं जगाला दाखविण्यासाठी चीन अशा प्रकारे सर्व शक्ती पणाला लावत आहे. घरी परतताना सोबत नेऊ नका कोरोना! ट्रेन प्रवासात व्हायरसपासून असा बचाव करा गेल्या का दिवसांपासून चीनने अनेक पर्यटनस्थळेही खुली केली आहेत आणि तिथे पर्यटकही येत असल्याचा दावा तिथल्या सरकारी माध्यमांनी केला आहे. काय कराल आणि काय नाही; लॉकडाऊनमध्ये अशी घ्या शारीरिक आरोग्याची काळजी
 कोरनामुळे सगळेच सध्या घरात बंद असल्याने स्मार्ट फोनची गरज जास्त जाणवू लगाली आहे. अशा परिस्थितीत हा बजेट फोन उत्तम फिचरसह आल्याने ग्राहकांनी त्याला पसंती दिल्याचं सांगितलं जात आहे.
First published:

पुढील बातम्या