Home /News /videsh /

इथे म्हणे एकही माणूस गरीब नाही; जिनपिंग यांचा समूळ दारिद्र्य उच्चाटनाचा दावा किती खरा?

इथे म्हणे एकही माणूस गरीब नाही; जिनपिंग यांचा समूळ दारिद्र्य उच्चाटनाचा दावा किती खरा?

कोरोना साथीपाठोपाठ (Coronavirus pandemic) जग मंदीच्या खाईत जात असताना चीनने भलताच दावा केला आहे. आम्ही गरिबीचं समूळ उच्चाटन केलं असल्याचं क्षी जिनपिंग यांचं म्हणणं आहे. या दाव्यात किती सत्य?

    नवी दिल्ली,  24 नोव्हेंबर : जगभरात कोरोनाने  (Coronavirus) धुमाकूळ घातला आहे. कोरोना विषाणू चीनमधून पसरला असल्याचा आरोप आहे. चीनचा दावा अर्थातच उलटा आहे. आमच्याकडून हा व्हायरस पसरलेला नाही असं सांगत चीन आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. जगभरात या महासाथीपाठोपाठ प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याने महामंदी येते की काय असं वाटत असताना आता चीनने (Xi Jinping) आणखी एक मोठा दावा केला आहे. आमच्या देशातली गरिबी झपाट्याने कमी होते आहे. 9 जिल्ह्यांमधून गरिबी समूळ नष्ट झाली असल्याचा दावा चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी केल्याचं चिनी माध्यमांनी म्हटलं आहे. त् चीनचं सरकारी वृत्तमाध्यम शिन्हुआने हा दावा केला आहे. गरिबी हटवण्यात आल्याचा दावा करण्यात आलेले हे जिल्हे दक्षिण-पश्चिम चीनच्या ग्युंझाऊ (Guizhou) प्रांतात असून येथे मोठ्या प्रमाणात गरिबीने आणि भूकबळीने नागरिकांचा जीव गेला होता. शिन्हुआच्या वृत्तानुसार चीनने येथून गरिबी नष्ट करण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं आणि ते पूर्ण केलंदेखील. 2019 च्या शेवटापर्यंत चीनमध्ये 52 जिल्हे दारिद्र्यरेषेच्या खाली होते. त्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच सर्व जिल्ह्यांनी स्वतःला गरिबीमुक्त झाल्याचे घोषित केले. चीन सरकारचा डाटादेखील या दाव्याला पुष्टी देत असून सरकारी प्रयत्नांमुळे साडेआठ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर आले आहेत. त्याचबरोबर जागतिक भुकेल्या लोकांच्या टक्केवारीतदेखील 70 टक्के घट झाली असून चीनमुळे यामध्ये मोठी वाढ झाली होती. चीनच्या दाव्यानुसार त्यांच्या ग्रामीण भागात गरिबी दरामध्ये  10.2 टक्क्यांवरून थेट 0.6 टक्क्यांपर्यंतची घट झाली आहे. आत्मविश्वास दुणावलेल्या चिनी अध्यक्ष शी जिनपिंग यांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या 75 व्या बैठकीत 2030 पर्यंत चीनमधून गरिबी समूळ नष्ट होणार असल्याचे म्हटले आहे. दाव्यात किती तथ्य? कोणताही देश गरिबी हटवल्याचा दावा करतो त्यावेळी 3 गोष्टींची माहिती घेणे गरजेचे आहे. यासाठी तीन महत्त्वाचे मानक आहेत. पहिलं मानक लोकांचं उत्पन्न. लोकांकडे खरेदीसाठी पुरेसे पैसे असले पाहिजेत. चीनच्या मते ग्रामीण भागातील शेतकर्‍यांचे वार्षिक उत्पन्न 4000 युआन इतके झाले आहे. गरिबी संपण्याचे दुसरे मानक म्हणजे चिंतामुक्त होणे. यामध्ये कुटुंबाकडे कपडे आणि खाण्यासाठी योग्य प्रमाणात कपडे आणि अन्नधान्य हवे. त्याचबरोबर तिसरे मानक म्हणजे गॅरंटी. यामध्ये मुलांना शिक्षण प्रत्येक वर्षी मिळायला हवे.  मेडिकल सुविधा आणि घराची सुविधादेखील सामील आहे. चीनने गरिबीमुक्त झाल्याचा दावा केलेला असला तरीदेखील त्यांच्या या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. मे 2019 मध्ये चीनच्या पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना या पक्षाचे नेते Li Keqiang यांनीच या विपरित विधान केलं होतं. 60 कोटी चिनी नागरिकांचं मासिक उत्पन्न हे 100 युआन म्हणजेच 10 हजार रुपये असल्याचा दावा केला होता. यामुळे इतक्या कमी रकमेमध्ये चीनच्या मध्यम आकाराच्या शहरातदेखील घर घेणं आणि भाडं देणं अशक्यप्राय गोष्ट आहे. भूकबळींची संख्या मोठी? कोरोनाच्या या काळात जिनपिंग यांच्या या दाव्यातील हवा देखील निघाली आहे. कारण कोरोनाच्या या संकटात देखील मजबूत अर्थव्यवस्थेचा दावा करणाऱ्या चीनमध्ये अन्नधान्याच्या तुटवड्यामुळे मोठ्या प्रमाणात भूकबळींची संख्या वाढल्याचे समोर आले होते. चीनने अन्नधान्य निर्यात करण्यासाठी असणारी सर्व अग्रिमेंटदेखील रद्द केली आहेत. इतकेच नाही तर चीन मोठ्या प्रमाणात धान्य खरेदी करत आहे. याचबरोबर अन्नधान्याचा तुटवडा भरून काढण्यासाठी चीन दुसऱ्या देशातील शेतीयोग्य जमीन भाडे पट्ट्यावरदेखील घेत आहे. यासाठी चीनने 94 बिलियन अमेरिकी डॉलर खर्च केला आहे. या देशांमध्ये आफ्रिकी देशांबरोबरच दक्षिण अमेरिकेतील देखील काही देश आहेत.
    First published:

    Tags: China

    पुढील बातम्या