जेव्हा लेखकच आपल्या पुस्तकाची पानं खातो...

जेव्हा लेखकच आपल्या पुस्तकाची पानं खातो...

मॅथ्यू गुडविन या लेखकानं एका लाईव्ह कार्यक्रमात आपलं स्वत:चं पुस्तकच चावून खाल्लं.

  • Share this:

12 जून : लेखकाचं आपल्या शब्दांवर, लिखाणावर प्रचंड प्रेम असतं. पण जर लेखकानं आपलं पुस्तक चावून खाल्लं तर ? दचकू नका.पण हे खरं घडलंय आणि  तेही एका लाईव्ह कार्यक्रमात.मॅथ्यू गुडविन या लेखकानं एका लाईव्ह कार्यक्रमात आपलं स्वत:चं पुस्तकच चावून खाल्लं.

ब्रिटनमध्ये नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीबाबत वर्तवलेला अंदाज चुकल्याने त्यांनी हा प्रकार केल्याचं सांगितलं आहे. या निवडणुकीत लेबर पार्टीला ३८ टक्क्यांहून कमी मतं मिळतील, असा दावा गुडविन यांनी केला होता. मात्र त्यांचा हा अंदाज चुकला आणि लेबर पार्टीला ४०.३ टक्के मतं मिळाली.  लेबर पार्टीला ३८ टक्क्यांहून जास्त मतं मिळतील असं मला वाटलं नव्हतं, असं मत लेखकाने व्यक्त केलं आहे.

मॅथ्यू गुडविन हे  युनिव्हर्सिटी ऑफ केंटमध्ये प्राध्यापक आहेत. 'ब्रेक्झिट व्हाय ब्रिटेन वॉण्टेड टू लिव्ह युरोपियन युनियन' या पुस्तकाचे ते सहलेखक आहेत. याच पुस्तकाची पानं त्यांनी चावून खाल्ली. मात्र गुडविन यांनी ही पानं गिळली नाहीत, असं स्काय न्यूजने स्पष्ट केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 12, 2017 02:16 PM IST

ताज्या बातम्या