धक्कादायक! जगातील समुद्रतळावर आहे तब्बल एवढा मायक्रो प्लॅस्टिकचा थर

धक्कादायक! जगातील समुद्रतळावर आहे तब्बल एवढा मायक्रो प्लॅस्टिकचा थर

ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय विज्ञान संस्थेने केलेल्या दाव्यानुसार समुद्रतळांबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जगातील समुद्र तळांवर अंदाजे 14 लाख टन मायक्रो प्लॅस्टिकचा थर आढळून आला आहे.

  • Share this:

सिडनी, 7 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय विज्ञान संस्थेने केलेल्या दाव्यानुसार समुद्रतळांबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जगातील समुद्र तळांवर अंदाजे 14 लाख टन मायक्रो प्लॅस्टिकचा थर आढळून आला आहे. हा कचरा पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक असल्याचं सांगितलं जात आहे. समुद्रतळात असलेल्या मायक्रो प्लॅस्टिकचा हा पहिला जागतिक अंदाज असल्याचं या संस्थेनी म्हटलं आहे. मायक्रो प्लॅस्टिकचं प्रदूषण जागतिकरित्या खूपच हानिकारक असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे प्राणी तसेच मानवी जीवन याला मोठी हानी पोहचू शकते. कचऱ्याचा हा थर समुद्राच्या तळाशी जाऊन अडकून राहिला तर याचा सगळ्यात मोठा फटका हा पर्यावरणाला बसणार आहे.

जगातील सगळ्याचं समुद्रतळांमध्ये आढळून आलेला हा कचरा ही पर्यावरणासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. कारण या समुद्रातील पाण्यावर प्राणी तसेच मानवी जीवन अवलंबून आहे.

सीएसआयआरओ (CSIRO) संस्थेच्या संशोधकांनी रोबोटिक पाणबुडीच्या मदतीने दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात 3,000 मीटर (9,850 फूट) खोल जाऊन कचऱ्याचे नमुने गोळा केले आहेत. संशोधन शास्त्रज्ञ डेनिस हार्डेसी यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या संशोधनात समुद्रतळात मायक्रो प्लॅस्टिकचा इतका कचरा पहिल्यांदाच आढळला आहे. खरं तर खोल समुद्र या कचऱ्याला आपल्यात सामावून घेतात. परंतु अशा ठिकाणी हा कचऱ्याचा इतका थर आढळणं हे खरंच धक्कादायक आहे. आणि तितकेच घातक आहे.

सागरी विज्ञान संस्थेच्या वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार समुद्रात उंच लाटा असलेल्या भागात मायक्रो प्लॅस्टिकचे तुकडे आढळून आले आहेत. या अभ्यासाचे प्रमुख जस्टिन बॅरेट म्हणाले, 'समुद्रातील कचऱ्याचा साठा जास्त प्रमाणात झाल्यावर त्याचे रूपांतर मायक्रो प्लॅस्टिकमध्ये होते.' पर्यावरणामुळे प्राणी आणि मानवी आरोग्यावर परिणाम होणाऱ्या या प्रदूषणावर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Published by: Shreyas
First published: October 7, 2020, 11:28 PM IST
Tags:

ताज्या बातम्या