मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

ऑस्ट्रेलियात सापडलं 380 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या माशाच्या हृदयाचं सुस्थितीतलं जीवाश्म

ऑस्ट्रेलियात सापडलं 380 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या माशाच्या हृदयाचं सुस्थितीतलं जीवाश्म

हा जीवाश्म arthrodire या नामशेष झालेल्या माशाच्या प्रजातीचा आहे. हा मासा जबडा असलेला होता. गुंतागुंतीची रचना असलेल्या S आकाराच्या हृदयाचं थ्रीडी मॉडेल समोर येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

हा जीवाश्म arthrodire या नामशेष झालेल्या माशाच्या प्रजातीचा आहे. हा मासा जबडा असलेला होता. गुंतागुंतीची रचना असलेल्या S आकाराच्या हृदयाचं थ्रीडी मॉडेल समोर येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

हा जीवाश्म arthrodire या नामशेष झालेल्या माशाच्या प्रजातीचा आहे. हा मासा जबडा असलेला होता. गुंतागुंतीची रचना असलेल्या S आकाराच्या हृदयाचं थ्रीडी मॉडेल समोर येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मुंबई : ऑस्ट्रेलियातल्या शास्त्रज्ञांना तब्बल 380 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या माशाच्या हृदयाचं जीवाश्म सापडलं आहे. आतापर्यंत सापडलेल्यापैकी हे सर्वांत प्राचीन हृदय असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं असून, पर्थमधल्या कर्टिन विद्यापीठाने (Curtin University) त्यावर संशोधन केलं आहे. त्यातून मानवी शरीराच्या उत्क्रांतीवर प्रकाश पडला असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनाबद्दलचं वृत्त 'मनीकंट्रोल डॉट कॉम'ने दिलं. पश्चिम ऑस्ट्रेलियातल्या किम्बर्ली प्रदेशात गोगो फॉर्मेशन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी शास्त्रज्ञांना माशाचा हा जीवाश्म सापडला. प्रा. केट ट्रिनाज्स्टिक यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहकाऱ्यांकडून हे संशोधन करण्यात आलं. माशाचा हा जीवाश्म चुनखडी खडकात जतन झाला होता. एक्स-रे आणि न्यूट्रॉन बीम्स यांच्या साह्याने त्या जीवाश्माचं स्कॅनिंग करून अभ्यास करण्यात आला, अशी माहिती कर्टिन युनिव्हर्सिटीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे. या जीवाश्माच्या (Fossil) आतल्या भागात असलेल्या मृदू ऊती अर्थात सॉफ्ट टिश्यूजची त्रिमित चित्रं म्हणजेच थ्रीडी इमेजेस (3D Images of Soft Tissues) तयार करण्यात आल्या आहेत. हा जीवाश्म arthrodire या नामशेष झालेल्या माशाच्या प्रजातीचा आहे. हा मासा जबडा असलेला होता. गुंतागुंतीची रचना असलेल्या S आकाराच्या हृदयाचं थ्रीडी मॉडेल समोर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. हा शोध खूपच आश्चर्यकारक असल्याची प्रतिक्रिया प्रा. ट्रिनाज्स्टिक यांनी व्यक्त केली आहे. 'जीवाश्म अभ्यासक (Palaentologist) म्हणून मी 20 वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहे. 380 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या प्राण्याचं हृदय थ्रीडी स्वरूपात अत्यंत उत्तम पद्धतीने जतन झालेलं असल्याचं पाहून मला खूपच आश्चर्य वाटलं आहे,' असं प्रा. ट्रिनाज्स्टिक म्हणाल्या. उत्क्रांतीच्या (Study of Evolution) अभ्यासासाठी या शोधाचा खूप मोठा उपयोग होणार आहे. 'उत्क्रांती ही प्रक्रिया अनेक छोट्या टप्प्यांच्या मालिकेतून विकसित झाली असल्याचं मानलं जातं; मात्र आता सापडलेल्या या जीवाश्मातून असं दिसून येत आहे, की जबडा नसलेल्या आणि जबडा असलेल्या पृष्ठवंशीय प्राण्यांच्या (Vertebrates) उत्क्रांतीमध्ये थेट मोठी प्रगती झाली होती. या माशांचं हृदय त्यांच्या तोंडात आणि त्यांच्या Gills मध्ये आहे. तसं आजच्या काळात शार्क माशांमध्ये पाहायला मिळतं. पृष्ठवंशीय प्राण्यांच्या उत्क्रांतीत त्यांच्या शरीररचनेत म्हणजेच Anatomyमध्ये कसे बदल झाले असावेत, याबद्दलचे काही महत्त्वाचे क्लूज या अभ्यासातून समोर आले आहेत,' असं त्या म्हणाल्या. 'प्राथमिक अवस्थेतल्या या पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये ही फीचर्स इतकी सुधारित स्थितीत होती, की जबड्याचा समावेश करून घेण्यासाठी डोक्याच्या आणि मानेच्या भागात बदलाला कशी सुरुवात झाली असू शकेल, याचा अंदाज याच्या अभ्यासातून येऊ शकेल. कारण उत्क्रांतीतला हा महत्त्वाचा टप्पा होता,' असंही त्यांनी सांगितलं. Keywords : Link : अनिकेत
First published:

पुढील बातम्या