S M L

जगातल्या सगळ्यात लठ्ठ महिलेचा मृत्यू

इमानच वजन 500 किलो होतं. अबु धाबीत वजन कमी करण्यासाठी तिच्यावर उपचार चालू होते.

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 25, 2017 05:00 PM IST

जगातल्या सगळ्यात लठ्ठ महिलेचा मृत्यू

अबु धाबी, 25 सप्टेंबर:एके काळी जगातली सगळ्यात लठ्ठ महिला असलेल्या इमान अहमदचा मृत्यू झाला आहे. इमानच वजन 500 किलो होतं. अबु धाबीत वजन कमी करण्यासाठी तिच्यावर उपचार चालू होते.

इतिप्तहुन बुर्जील हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिच्या उपचारासाठी 20 तज्ज्ञ डाॅक्टरांची टीम सज्ज होती. हाॅस्पिटलचे सीईओ डाॅ. यासीन एल शाहत यांनी सांगितलं की, "इमान उपचाराच्या दुसऱ्या स्टेजमध्ये जेवण करत होती आणि व्हिलचेअरचाही ती वापर करत होते. मात्र, तब्येत खालवल्यामुळे आम्ही तिला वाचवू शकलो नाही."

याआधी इमान अहमदने फेब्रुवारीमध्ये मुंबईतील सैफी हाॅस्पिटमध्ये  कमी करण्याची शस्त्रक्रिया केली होती. शस्त्रक्रियेआधी तिचं वजन 504 किलो इतकं होतं. मुंबईत तब्बल 4 महिने तिच्यावर उपचार सुरू होते. या दरम्यान इमानचं वजन 300 किलो पर्यंत कमी झालं होतं अशा दावा सैफी हाॅस्पिटलने केला होता. पण, वजन कमी झालंच नाही असा दावा तिच्या बहिणीने केलं होतं. त्यांनंतर ती इजिप्तला गेली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 25, 2017 02:45 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close