बॉम्ब टाकला होता 1945 मध्ये; स्फोट झाला 2019 साली!

बॉम्ब टाकला होता 1945 मध्ये; स्फोट झाला 2019 साली!

बॉम्ब निकामी करत असताना झाला स्फोट आणि...

  • Share this:

वर्झावा, 09 ऑक्टोबर: जगाच्या इतिहासात आतापर्यंत दोन महायुद्धांची नोंद झाली आहे. त्यातील पहिले महायुद्ध 1914 ते 1918 या काळात तर दुसरे महायुद्ध 1939 ते 1945 याकाळात झाले. या दोन्ही युद्धाचे ठिकाण प्रामुख्याने युरोपच होते. त्यामुळेच या मुहायुद्धाच्या काळातील अनेक जिवंत गोष्टी आजही युरोपात आढळतात. मंगळवारी अशीच एक घटना उघडकीस आली ज्यात दोघा जवानांचा मृत्यू झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले.

पोलंडची राजधानी वर्झावापासून जवळ असलेल्या कुरनिया रासिबोर्सका येथील जंगलात एक जिवंत बॉम्ब सापडला. याची माहिती मिळताच लष्कराने घटनास्थळी धाव घेतली आणि संबंधित बॉम्ब निकामी करण्याचे काम सुरु केले. पण हे काम सुरु असतानाच बॉम्बचा स्फोट झाला आणि दोघा जवानांचा मृत्यू झाला. यासंदर्भात स्थानिक मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार हा बॉम्ब दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील होता. बॉम्बच्या स्फोटात अन्य दोन जवान गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केल्याचे संरक्षण मंत्री मारिऊस ब्लास्जजाक यांनी सांगितले. ज्या जवानांचा मृत्यू झाला ते दोघेही पोलंडच्या पॅराशूट रेजिमेंटचे होते.

ज्या परिसरात हा बॉम्ब मिळाला तेथील जंगलातून गेल्या काही दिवसात शस्त्रे आणि बॉम्ब सापडले होते. या कामासाठी एक पथक बॉम्ब निकामी करण्यासाठी नेण्यात आले होते. दुसऱ्या महायुद्धात शत्रू राष्ट्राकडून टाकण्यात आलेले बॉम्ब अधूनमधून युरोपातील विविध देशात तसेच पोलंडमध्ये सापडतात. युद्धाच्या काळात जर्मनीने पोलंड ताब्यात घेतले होते.

असे झाले होते दुसरे महायुद्ध

01 सप्टेंबर 1939 ते 02 सप्टेंबर 1945 या काळात झाले युद्ध

जवळपास 70 देशांचे सैन्य या युद्धात सहभागी झाले

जर्मनी,इटली, जपान विरुद्ध इंग्लंड, रशिया, अमेरिका, चीन असे या युद्धाचे स्वरुप होते

या युद्धात सहा कोटींच्यावर जीवित हानी झाली. मानवी इतिहासातील ही सर्वात मोठी जीवित हानी असल्याचे मानले जाते

मेट्रोचं काम सुरू असताना आढळला तब्बल 13 फुटांचा अजगर, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: bomb
First Published: Oct 9, 2019 07:33 AM IST

ताज्या बातम्या