• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • अभिमानास्पद! ज्वालामुखीत अडकलेल्या नागरिकांचे भारतीय लष्कराने वाचवले प्राण

अभिमानास्पद! ज्वालामुखीत अडकलेल्या नागरिकांचे भारतीय लष्कराने वाचवले प्राण

देशातच नाही तर जगभरात कोणत्याही संकटाच्या वेळी सामान्य नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी भारतीय लष्कर (Indian Army) सज्ज असते.

 • Share this:
  मुंबई, 23 मे : देशातच नाही तर जगभरात कोणत्याही संकटाच्या वेळी सामान्य नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी भारतीय लष्कर (Indian Army) सज्ज असते. संयुक्त राष्ट्राच्या (UN) वेगवेळ्या पथकात भारतीय लष्कराने केलेले कार्य हे संपूर्ण देशासाठी नेहमीच अभिमानाचा विषय आहे. कांगो (Congo) देशातील गोमा शहराजवळील ज्वालामुखीचा (volcano)उद्रेक झाला. माऊंट नीरागोंगो (Mount Nyaragongo) ज्वालामुखीच्या वेढ्यात अडकलेल्या नागरिकांचे प्राण वाचवण्याचे अभिमानस्पद काम भारतीय लष्कराने केले आहे. गोमा शहराजवळचा माऊंट नीरागोंगो या जागृत ज्वालामुखीचा शनिवारी उद्रेक झाला. त्यामुळे संपूर्ण आभाळ लाल झाले. ज्वालामुखाचा उद्रेक झाल्याने शहरातले नागरिक दहशतीमध्ये होते. गोमा शहराला अन्य भागाशी जोडणाऱ्या रस्त्यावरच हा उद्रेक झाल्याने बचाव कार्यात अनेक अडथळे निर्माण झाले. यामध्ये किती नागरिकांचा मृत्यू झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. संयुक्त राष्ट्राच्या अभियानाच्या अंतर्गत भारतीय लष्कराची तुकडी कांगोमध्ये तैनात आहे. या तुकडीने या बिकट परिस्थितीमध्ये जीवाची बाजी लावून काम करत शहरात अडकलेले संयुक्त राष्ट्राचे कर्मचारी आणि अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. या ज्वालामुखीचा यापूर्वी 2002 साली उद्रेक झाला होता. त्यावेळी देखील शेकडो लोकांचा यामध्ये मृत्यू झाला होता. त्याचबरोबर शहराच्या विमानतळाचे देखील यामध्ये नुकसान झाले होते. ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या इशाऱ्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. स्थानिकांना शहराबाहेर पडण्याचा आदेश दिला नाही, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. 14 वर्षाच्या मुलीनं रेस्टॉरंटबाहेरच दिला बाळाला जन्म, ग्राहकाकडे मुलं सोपवून फरार सध्या हा ज्वालामुखी गोमा शहराच्या दिशेने जाईल असे वाटत नाही, तरीही आम्ही सतर्क असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या मिशनमध्ये तैनात असलेल्या जवानांच्या तुकडीने सांगितले आहे.
  Published by:News18 Desk
  First published: