मुंबई, 29 मे : सरकारी सेवेत काम केल्यानंतर निवृत्त झालेले कुत्रे (Dog) आणि घोडे (Horse) यांना पेन्शन देण्याचा निर्णय पोलंड सरकारने (Poland Government) घेतला आहे. याबाबतचा अधिकृत प्रस्ताव सरकारकडून संसदेत सादर करण्यात आला आहे.देशाची आणि समाजाची सेवा केल्यानंतर या जनावरांना सुरक्षा देणे ही नैतिक जबाबदारी असल्याचे मत पोलंड सरकारने व्यक्त केले आहे. हे विधेयक पास झाल्यानंतर या जनावरांना अधिकृत दर्जा देण्यात येईल.
पोलंडचे गृहमंत्री मॉरीस कमिन्सकी (Mariusz Kaminski यांनी या विधयेकाबाबत माहिती देताना सांगितले की, "हे कुत्रे आणि घोडे इमारत कोसळल्यानंतर त्या ढिगाऱ्याखाली जिवंत असलेल्या नागरिकांचा शोध घेतात. त्याचबरोबर फरार गुन्हेगार, ड्रग्ज आणि स्फोटकांचा तपास लावण्यासाठी देखील मदत करतात. आता त्यांचा उपयोग गोंधळ घालणाऱ्या नागरिकांना नियंत्रणात आणण्यासाठी देखील केला जात आहे.
सेवा निवृत्तीनंतर त्यांच्या भविष्याची कोणतीही सोय नाही. त्यामुळे या निवृत्त कुत्र्यांना दत्तक घेणाऱ्या व्यक्तींना देखील अडचणींचा सामना करावा लागतो. हे नवे विधेयक संमत झाल्यानंतर या जनावरांची देखभाल करणाऱ्या स्वयंसेवी संस्था किंवा खासगी मालकांना मोठी मदत मिळणार आहे. "
VIRAL PHOTOS नं तरुणीला बनवलं सर्वाधिक लोकप्रिय व्यवसायिक, सौंदर्यावर लाखो फिदा
पोलंडमधील नव्या कायद्याचा निवृत्त झालेले 1200 कुत्रे आणि 60 घोड्यांना फायदा होणार आहे. पोलंड सरकारच्या सेवेत काम करणारे बहुतेक कुत्रे हे बेल्जियम शेपर्ड या जर्मन प्रजातीचे आहेत. सरकारी सेवेतील एकूण जनावरांपैकी 10 टक्के दरवर्षी निवृत्त होतात. त्यांना पेन्शन मिळाल्यानंतर त्यांच्यावरील महागडे उपचारासाठी नव्या मालकांना मदत मिळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dog, Pension, World news