मराठी बातम्या /बातम्या /विदेश /मुलांचं 18 व्या वर्षी लग्न केले नाही तर आई-वडिलांना दंड! पाकिस्तानात नव्या कायद्याचा प्रस्ताव

मुलांचं 18 व्या वर्षी लग्न केले नाही तर आई-वडिलांना दंड! पाकिस्तानात नव्या कायद्याचा प्रस्ताव

पाकिस्तानमधील (Pakistan) एका नेत्याने सादर केलेला अजब कायद्याचा प्रस्ताव सध्या देशात चर्चेचा विषय बनला आहे. या कायद्यानुसार 18 वर्ष पूर्ण केलेल्या मुलांनी लग्न करणे बंधनकारक असेल.

पाकिस्तानमधील (Pakistan) एका नेत्याने सादर केलेला अजब कायद्याचा प्रस्ताव सध्या देशात चर्चेचा विषय बनला आहे. या कायद्यानुसार 18 वर्ष पूर्ण केलेल्या मुलांनी लग्न करणे बंधनकारक असेल.

पाकिस्तानमधील (Pakistan) एका नेत्याने सादर केलेला अजब कायद्याचा प्रस्ताव सध्या देशात चर्चेचा विषय बनला आहे. या कायद्यानुसार 18 वर्ष पूर्ण केलेल्या मुलांनी लग्न करणे बंधनकारक असेल.

कराची, 28 मे: लग्न करण्याचे (marriage) किमान वय काय असावे? यावर जगभर चर्चा सुरु असते. सर्वच देशात लग्न करण्याचे किमान वयाबाबत कायदे आहेत. कोणत्याही देशात लग्नासाठी कमाल वयाची अट नाही. पाकिस्तानमधील (Pakistan) एका नेत्याने सादर केलेला अजब कायद्याचा प्रस्ताव सध्या देशात चर्चेचा विषय बनला आहे. या कायद्यानुसार 18 वर्ष पूर्ण केलेल्या मुलांनी लग्न करणे बंधनकारक असेल. या कायद्याचे पालन न करणाऱ्या मुलांच्या आई-वडिलांना आर्थिक दंड आकारण्याची तरतूद या प्रस्तावित कायद्यामध्ये आहे.

पाकिस्तानातील मजलिस-ए-अमल पार्टी (Majlis-e-Amal) पार्टीचे नेता सईद अब्दुल रशीद (Saeed Abdul Rasheed) यांनी सिंध प्रांताच्या (Sindh) विधानसभेत या विधेयकाचा प्रस्ताव सादर केला आहे. पाकिस्तानमधील 'डॉन' या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार सिंध अनिवार्य विवाह अधिनियम 2021 असे या कायद्याचे नाव आहे. यामध्ये 18 व्या वर्षी मुलाचे लग्न लावण्यास असमर्थ ठरलेल्या पालकांना 500 रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे. त्याचबरोबर त्यांना डेप्युटी कमिशनरकडे मुलाचे लग्न न लावण्याचे योग्य कारण प्रतिज्ञापत्राच्या आधारे सादर करावे लागेल.

मुस्लीम शिक्षणानुसार पुरुष आणि महिलांना 18 व्या वर्षी लग्न करण्याचा अधिकार दिला आहे. याची अंमलबजावणी करणे मुलांच्या पालकांची जबाबदारी आहे. या कायद्यामुळे लहान मुलांचे लैंगिक शोषण, बलात्कार, अनैतिक संबंध या गोष्टींना आळा बसेल असा दावा सईद यांनी केला आहे.

इस्लामी शिक्षणापासून दूर गेल्याने पाकिस्तानी तरुणांच्या लग्नात अडथळे निर्माण होत आहेत, असा दावा सईद यांनी केला. बेरोजगारी आणि लग्नातील खर्चांमुळे देशातील नागरिकांच्या विवाहात अडथळे निर्माण होत असल्याचा त्यांचा दावा आहे.

Covid Lottery नं केलं मालामाल, लसीच्या एका डोसनं तरुणीला रातोरात बनवलं करोडपती

सईद 2018 पासून सिंध विधानसभेचे सदस्य आहेत. त्यांनी यापूर्वी लग्नातील अडथळे दूर व्हावे म्हणून हुंडा घेण्यास बंदी घालण्याची मागणी केली होती. आपल्या प्रस्तावित कायद्याला पाकिस्तानचे तरुण आनंदाने मान्यता देतील, असा दावा त्यांनी केला आहे.

First published:
top videos

    Tags: Marriage, Pakistan, World news