मुंबई, 13 जून: कोरोना महामारी आणि आर्थिक संकट यामुळे पाकिस्तान
(Pakistan) हा देश संकटात सापडला आहे. यामधून बाहेर पडण्यासाठी इम्रान सरकारने
(Imran Khan Government) नवा उपाय करण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला आहे. चीन आणि अमेरिका
(China and America) या पाकिस्तानच्या मित्र देशांनीच त्याला तोंडघशी पाडलं आहे.
पाकिस्तानच्या विदेश मित्रलयाने बुधवारी अमेरिका, चीनसह वेगवेगळ्या देशांना आंबे भेट म्हणून पाठवले होते. अमेरिका आणि चीन या बड्या राष्ट्रांना पाकिस्तानची मँगो डिप्लोमसी
(Mango Diplomacy) पटली नाही. त्यांनी हे आंबे परत पाठवले. या देशांनी कोरोना व्हायरसच्या नियमांचं कारण देत पाकिस्तानची भेट स्वीकारण्यास नकार दिल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.
या रिपोर्टनुसार, पाकिस्तानचे अध्यक्ष डॉ. अरिफ अल्वी यांनी 32 देशांच्या अध्यक्षांना आणि सरकारच्या प्रमुखांना 'चौसा' आंबे पाठवले होते. आंब्याची ही पेटी इराण, अरब देश, तुर्की, अमेरिका, अफगाणिस्तान, बांगलादेश, चीन आणि रशिया या देशांना पाठवण्यात आली होती. पाकिस्तान सरकारच्या विदेश मंत्रालयाच्या या यादीमध्ये फ्रान्सचे देखील नाव होते. फ्रान्सचे अध्यक्ष इम्यूनल मॅक्रो यांनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
सिमकार्डची तस्करी करणाऱ्या चिनी गुप्तहेरानं केला मोठा खुलासा
'या' देशांचा नकार
चीन आणि अमेरिकेशिवाय कॅनडा, नेपाळ, इजिप्त, आणि श्रीलंका या देशांनी पाकिस्तान सरकारची भेट नाकारली आहे. यासाठी कोरोना व्हायरसचा प्रसार रोखणे आणि क्वारंटाईनचे नियम हे कारण देण्यात आले आहे. 'अन्वर रत्तौल' आणि 'सिंधारी जातींच्या अंब्याचाही पाकिस्तान सरकारकडून भेट देण्याच्या यादीमध्ये सुरूवातीला समावेश होता, नंतर या आंब्यांना कमी करण्यात आले, अशी माहिती माध्यमांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.