सोशल मीडियावर वादळ कराचीतील हॉटेलनं प्रसिद्धीसाठी केलेल्या या प्रकारानंतर सोशल मीडियात जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. 'तुमची कृती योग्य ठरवण्यासाठी या प्रकारच्या प्रसंगाचा वापर करणे मूर्खपणा आहे', अशी प्रतिक्रिया एका युझरनं दिली आहे. तर आणखी एका इन्स्टाग्राम युझरनं या प्रकारच्या कृतीनं तुम्हाला काही ग्राहक मिळतील पण ही चुकीची पद्धत आहे,' या शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. हजारो रुपयांच्या ट्रिटमेंट करुन माय-लेकी झाल्या सुंदर; बिल पाहताच दोघीही फरार! या हॉटेलनं मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. 'ही फक्त एक संकल्पना आहे. कुणालाही दुखावण्याचा आमचा हेतू नाही. आम्ही तुमच्या सर्वांची पूर्वीप्रमाणेच प्रेमानं सेवा करण्यासाठी सज्ज आहोत,' असं स्पष्टीकरण या हॉटेलनं दिलं आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Alia Bhatt, Instagram, Pakistan, Social media